स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.12) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत तुली इम्पेरियल, रामदासपेठ येथील सुत्रा एक्सीबीशन यांच्याविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच लकडगंज झोन अंतर्गत छापरुनगर चौक येथील लोकल प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत नॉर्थ अंबाझरी रोड येथील रॉयल प्रॉपट्री यांच्याविरुध्द रस्त्याच्या कडेला इलेक्ट्रॉनिक जंक्शन बोर्डवर बॅनर/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘ॲट्रासिटी’ कायद्यांतर्गत प्रकरणांचा जिल्हास्तरावर नियमित आढावा घ्यावा - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

Thu Oct 13 , 2022
विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची सभा नागपूर :- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा जिल्हास्तरावर नियमित आढावा घेवून ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights