बसपाने रमाईंना अभिवादन केले

नागपूर :- संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या सहचारीने व बहुजन समाजाच्या मातोश्री रमाई यांच्या 88 व्या स्मृतिदिना निमित्त नागपूर शहर व जिल्हा बसपाच्या वतीने उत्तर नागपूर च्या यादव नगरातील रमाई उद्यानात असलेल्या रमाईच्या भव्य पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत नागपूर शहर व जिल्हा बसपा च्या वतीने रमाईच्या भव्य पुतळ्याला नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे, माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, माजी नगरसेवक व मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, गौतम पाटील, मोहम्मद इब्राहिम टेलर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थिनींच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यादव नगरच्या रमाई उद्यानातील बहुजन हिताय बुद्ध विहार परिसरात झालेल्या छोटेखानी सभेत जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी मार्गदर्शन करताना रमाईच्या असीम त्यागातून व परिश्रमातून बाबासाहेब घडले, त्यामुळे रमाई ही भारतातील संपूर्ण बहुजनांची (दलित, शोषित, पीडित, मागासवर्गीय) ह्यांची मातोश्री ठरली असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन माजी नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी तर समारोप बहुजन हिताय बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष उत्तम चहांदे यांनी केला.

याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, उत्तर नागपूर अध्यक्ष जगदीश गजभिये, दक्षिण नागपूर अध्यक्ष जितेंद्र पाटील, युवा कार्यकर्ते अंकित थुल, ज्येष्ठ कार्यकर्ते बुद्धम् राऊत, नितीन वंजारी, हाजी गुड्डूभाई, प्रदीप लोखंडे, यशवंत भिवगडे, अनिल मेश्राम, प्रशांत सोमकुवर, गौतम सरदार, राजरत्न कांबळे, रोहित ईलपाची, अन्वर अन्सारी, सुबोध साखरे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

विद्या फेंडर यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) प्रदान

Sat May 27 , 2023
नागपूर :- मूळच्या नागपूर येथील पण सध्या सुरत येथे राहणाऱ्या विद्या फेंडर यांना ‘ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स’ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची” विद्यावाचस्पती “(पीएचडी) पदवी यावर्षी प्रदान करण्यात आली आहे.” वैदिक ज्योतिष विद्या व वास्तुशास्त्र यांचा संबंध आणि त्याचा सद्यस्थितीत व्यापार आणि वाणिज्य यावर होणारा परिणाम” हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉ. जान्हवी महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com