संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
एफ सी आय गोदाम मार्ग, प्रशासनाला दुरुस्ती ची एलर्जी
कामठी ता प्रतिनिधि 13 सप्टेबर : नवी कामठी भागातील रमानगर रेलवे क्रॉसिंग ते विक्तुबाबा नगर दरम्यान ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे व त्यात साचणाऱ्या पावसाच्या पाण्या मुळे रोडवर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे नागरिकांवर काय तो रोड, काय ते खड्डे, काय तो चिखल…. सारेच त्रस्त ! असे म्हणण्याची वेळ आली आहे विशेष म्हणजे, वांरवांर पाठपुरावा करूनही या रोड बांधकामाची मागणी पुर्ण करण्यात न आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागा सह प्रशासनाला रोड बांधकामाची एलर्जी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या मार्गावर कोठारी गैस गोदाम, शक्ति रोलिंग मिल, महावितरण चे कार्यालय व गोदाम, कामठी तालुका व शहराला अन्नधान्य पुरवठा करणारे एफ सी आय चे धान्य गोदाम आणि विक्तुबाबा नगर, शिव नगर रामगढ़, आनंद नगर या लोकवस्त्या आहेत.त्यामुळे या रोड वर 24 तास जड वाहनांची वर्दळ असते वाहन चालकांना वाहन चालवितांना कसरत करावी लागते तर नागरिकांना जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावा लागतो या खड्डायांचा त्रास विद्यारथ्याना रोज सहन करावा लागतो.
या रोडच्या बांधकामासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधि मंजूर केला होता दरम्यान सत्तातर झाल्याने रोड बांधकाम रखड़ले या रोडच्या बांधकामा साठी नगर परिषद कामठी, सार्वजनिक बांधकाम उप विभाग कामठी यांच्या कडे अनेकदा मागणी करण्यात आली परंतु सबंधिकाऱ्यानी लक्ष दिले नाही असा आरोप येथील नागरिक किशोर शर्मा, श्यामराव मैंद,जागेश्वर गोंडाने,सतीश यादव, राजेश पाटील, रोहित रामटेके विरेंद्र राऊत, राजू सोनानी, खेमराज सहारे, मनोहर गजभिये, सचिन टोंगसे, क्रांति सोनवाने सह भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी केला आहे.
या रोड वरील जड वाहनांच्या वाहतुकीच्या वर्दळी मुळे खड्डाच्या संखयेत रोज भर पडत असून, त्यांची रुंदी व खोलीही वाढत आहे या रोड वर अपघात होऊन जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही समस्या सोडविण्या साठी भाजपा पदाधिकाऱ्याच्या शिष्टमंडळाने भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी संदीप बोरकर याना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली व संभाव्य मोठा अपघात टाळण्या साठी या रोड चे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी केली
– प्रभाग 15 च्या नागरिकांना या खडड्या मधुन मार्गक्रमण करावे लागत आहे वाहन खडड्या तुन गेल्यास अथवा ते चुकविण्याच्या प्रयत्न त समोरुन येणाऱ्या वाहनाला धडक लागल्यास अपघात होत आहे रात्री च्या वेळी वाहनाच्या हेड लाईट च्या प्रकाश झोतात खड़ंड्या चा आकार व खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाता सोबत वाहनाचे नुकसान व चालकांना कंबर व पाठीच्या मणक्या चा त्रास सहन करावा लागत आहे
प्रशासनाने नगर परिषद सभेत या रोड बाबत प्रस्ताव मंजूर असून अंदाज पत्रक तयार करुन तातडीने रोड बांधकामाचे कार्य प्रशासकीय स्तरा वर सुरु करावे-माजी नगरसेविका संध्या रायबोले.