निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर गडचिरोलीत दाखल

– निवडणूक विषयक तक्रारी देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

गडचिरोली :- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून अनिमेष कुमार पराशर (भा.प्र.से.) हे आज गडचिरोली येथे दाखल झाले आहेत.

निवडणूक निरिक्षक पराशर सर्किट हाऊस कॉम्पलेक्स येथील मार्कंडा कक्षात ते मुक्कामी आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक 9420067626 असून कार्यालयीन संपर्क क्रमांक 07132233184 असा आहे. त्‍यांच्याकडे निवडणूक विषयक कामकाजासंदर्भातील तक्रारी प्रत्यक्ष भेटून सकाळी 11 ते 12 या वेळेत देता येतील किंवा मोबाईलवर संपर्क साधता येईल.

तसेच निवडणूक खर्च निरिक्षक एस. वेणुगोपाल सर्किट हाऊसमधील चपराळा या कक्षात मुक्कामी आहेत. निवडणुक खर्चविषयक तक्रारी एस. वेणु गोपाल यांच्या 9420067690 या संपर्क क्रमांकावर द्याव्यात, असे निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Thu Mar 28 , 2024
नागपूर :- भारत निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हयातील रामटेक आणि नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विजय सिंग मिना यांची निवडणूक निरीक्षक ( पोलिस) (police Election Observer) म्हणून नियुक्ती केली आहे. मिना यांचा मो. क्र. ८४५९९२१४५३ असा आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निरीक्षणासाठी आलेल्या मिना यांची राहण्याची व्यवस्था रविभवन येथील कॉटेज क्र. ४ येथे करण्यात आलेली आहे. कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com