नागपूर – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाल्यावरून उमरेड उपविभागातील पो स्टे कुही हद्दीतील दुरक्षेत्र पाचगाव होतौल मौजा पाचगाव येथील सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्टचे डोरमेट्री हॉल येथे साऊंड सिस्टीमवर अश्लील गाणे वाजवून मुलांना तोकडे व कमी कपडे घालून विभस्तपणे चेहरा व हाताचे इशारे करून मुलींना नाचवून व त्याचेवर पैसे उधळून रिसॉर्ट मालकाकडून अवैधरित्या विदेशी दारू पुरविली जात आहे. अशा खात्रीशीर मिळालेल्या माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून नमुद घटनास्थळी रेड केली असता रेड दरम्यान काही मुली अश्लील हाव भाव करून कमी कपडे घालून नृत्य करताना व काही पुरुष नृत्य करणान्या मुलींवर पैसे उडवतांना मिळून आल्याने रेड केली असता सदर ठिकाणी १३ महिला व आरोपी नामे १) रिसॉर्ट चालविणारा राजबापू मुधईया दुर्गे, रा. नागपूर २) मॅनेजर विपीन यशवंत आलेने, रा. जगनाडे चौक नागपूर ३) अश्लील नृत्य करिता मुली पुरविणारा भुपेंद्र उर्फ मॉन्टी सुरेश अणे, रा. रामटेक ४) अभय वेंकटेश सकाडे, वर्धा ५) अतुल ज्ञानेश्वर चापले रा. मोठी अंजी वर्धा ६) शुभम ओमप्रकाश पवणीकर, रा. जुनी मंगळवारी नागपूर ७) विशाल माणिकराव वाणी, रा. जुनोना जि. ८) आशिष नथुजी सकांडे रा. गांधी नगर वर्धा ९) हर्षल भाऊराव माळवे, रा. मानस मंदिर १०) विजय सदाशिव मेश्राम, रा. तीगाव जि. वर्धा ११) प्रवीण महादेवराव पाटील, रा. मसाला वर्धा १२) अशोक तुकाराम चापडे रा. गजानन नगरी सेलू जि. वर्षा १३) कौसर अली लियाकत अली सईद, रा. केळझर जि. वर्धा १४) प्रशांत ज्ञानेश्वर धोगडे, रा. जुना पाणी जि. वर्धा १५) प्रवीण रामभाऊ बिडकर रा. रोठा जि. वर्धा १६) सतीश उध्दवराव वाटकर, रा. हिंगणी जि. वर्धा १७) गजानन रामदास घोरे, रा. पिंपळगाव ता. बाळापूर जि. अकोला १८) महेश महादेव मेश्राम, रा. झडशी जि. वर्षां १९) गोविंद जेठालाल जोतवानी, रा. साईं मंदिर वर्धा २०) राकेश विठ्ठलराव भांडेकर रा. खापरी वार्ड क्र. २ जि. वर्धा २१ ) अविनाश शंकरराव पंधराम रा. बोरखेडी कला जि. वर्धा २२) आकाश किसना पिंपळे, रा. झडशी जि. वर्धा २३) राजेश रमेश शर्मा रा. दयाळ नगर अमरावती २४) संजय सत्तणारायन राठी, रा. प्रताप नगर वर्धा तसेच विभस्त नृत्य करणारे १३ महिला आरोपी असे एकूण ३० आरोपी पुरुष व महिला वरीलप्रमाणे कृत्य करीत असतांना मिळुन आले. सदरचे सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्ट हे शिला केशव ठाकरे, वय ५६ वर्ष, रा. १५७ अभ्यंकर नगर नागपूर तसेच संध्या अशोक ठाकरे, वय ५८ वर्ष, रा. १५७ अभ्यंकर नगर नागपूर यांच्या मालकीची असून राजबापू मुथईया दुर्गे, रा. नागपूर याने किरायाने घेतले होते. यामध्ये महिला आरोपी १) हेमलता वय ३६ वर्षे रा. ह.मु. अशोक कॉलनी खामला नागपूर २) स्नेहा वय २३ वर्षे रा. बजरंग नगर, मानेवाडा रोड नागपूर ३) रूणाली वय २७ वर्षे रा. रामेश्वरी रोड भिमनगर नागपूर ४) किर्ती वय २३ वर्षे रा. भवानी नगर, भरतवाड़ा रोड नागपूर पारडी, नागपूर ५) राणी वय ३० वर्षे रा. पार्वती नगर, नागपूर ६) किर्ती वय ३५ वर्षे रा. शारदा चौक गिट्टीखदान नागपूर ७) मोहिन वय २१ वर्षे रा. जरीपटका नागपूर ८) सुशमा वय ३५ वर्षे गोरेवाडा नागपूर ९) मनाली वय २४ वर्षे रा. कौशल्य नगर, कामठी रोड नागपूर १०) आरती वय २५ वर्षे रा. भरतवाडा नागपुर (११) छकूली वय २४ वर्षे रा. नागपूर (१२) नेहा शहा वय २४ वर्षे चंद्रमणी नगर, नागपुर (१३) दिव्या वय २८ वर्षे रा. सदर नागपूर त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन कुही येथे विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपीता कडुन १) २ विदेशी दारूचे बॉटल ७५० ml एकूण २३४० /- रू. २) १ विदेशी दारूची २००० ml ची बॉटल किमती ३८४०/- रुपये ३) दोन ब्लूटूथ स्पीकर ३५०००/- रु ४) २ डिस्को लाइट किमती १००००/-रु. ५) १ माईक किंमती २०००६) महिंद्रा झायलो किंमती १०,००,०००/-5 (3) महिंद्रा स्कॉर्पिओ किमती १२,००,०००/- ८) महिंद्रा बोलेरो निओ किंमती ८,००,०००/- रु. ९) स्विफ्ट डिझार किमती ५,००,०००/- रु. १०) मारुती एस क्रॉस किंमती १२,००,०००/- रु. ११) रोख रक्कम १,१२,७००/- रु. असा एकूण ४८,४८,८८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे कुही दरक्षेत्र पाचगाव यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भा.पो से) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे बद्दलाल पांडे, सहायक फौजदार चंद्रशेखर गाडेकर, ज्ञानेश्वर राऊत, पोलीस हवालदार गजेन्द्र चौधरी, अरविंद भगत, मयूर डेकले, दिनेश अधापुरे, विनोद काळे, आशिष भुरे, प्रमोद भोयर, इक्बाल शेख, महिला पोलीस हवालदार कति पोलीस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे, संजय भंदोरीया, महिला पोलीस नायक वनिता पोडे, पोली राकेश तालेवार चालक पोलीस नायक शुक्ला, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, चालक पोली सुमित बागडे, आशुतोष लांजेवार, तसेच पोलीस स्टेशन कुहीचे पोलीस उपनिरीक्षक सोनकुसरे व त्यांचा पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर पोस्टे कुही हे करीत आहेत…
@प्रातिनिधिक फोटो