नागपूर :- सिनीयर सिटीजन कौंसिल ऑफ नागपूरतर्फे 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मतदान जनजागृती पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आणि जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरराव खर्चे असतील.
मानेवाडा चौक (रिंग रोड) येथून या पदयात्रेची सुरुवात होईल. पदयात्रा मार्ग हा मानेवाडा चौक ते उदयनगर चौक असा असणार आहे. 6 एप्रिल रोजी मतदान शपथ महोत्सवात सहभागी सदस्यांना सहभाग मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे संयोजक व सचिव सुरेश रेवतकर यांनी कळविले आहे.