केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केली श्रीरामाची आराधना

– पोद्दारेश्वर मंदिर, जनसंपर्क कार्यालयातील कार्यक्रमांना उपस्थिती

नागपूर :- अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) शहरातील विविध ठिकाणी श्रीरामाची पूजा अर्चना तसेच आराधना केली.

पोद्दारेश्वर राम मंदिर, खामला येथील जनसंपर्क कार्यालय आणि बजेरिया येथील अवध महोत्सवाला ना. नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. सकाळी एन्रिको हाईट्स येथील निवासस्थानी आयोजित पूजेमध्ये ना. नितीन गडकरी सहभागी झाले. यावेळी त्यांनी रामरक्षा, हनुमान स्तोत्र पठण तसेच श्रीरामाची आरती केली. यावेळी कांचन गडकरी, निखिल गडकरी, ऋतुजा गडकरी, नातवंड तसेच संपूर्ण गडकरी कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. यावेळी सोनु अग्निहोत्री मूकबधिर शाळेचे विद्यार्थी देखील उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी बजेरिया येथील अवध महोत्सवाला हजेरी लावली. याठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. येथील दिव्यांची आकर्षक आरास बघून त्यांनी मंदिर समितीचे कौतुक केले. यावेळी आमदार प्रवीण दटके यांची उपस्थिती होती.

त्यानंतर ना. नितीन गडकरी यांनी खामला येथील जनसंपर्क कार्यालयात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण बघितले. याप्रसंगी भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण होताच ना. गडकरी यांच्यासह नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. श्रीरामाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ना. गडकरी यांनी सर्व नागरिकांना श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभेच्छा दिल्या.

स्वप्न साकार झाले : ना. नितीन गडकरी

अयोध्या धाममध्ये कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य-दिव्य मंदिराचे बांधकाम आणि श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा हे रामराज्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. याबद्दलचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि सर्व संतांच्या उपस्थितीत श्रीरामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला; मन प्रसन्न झाले. आज सर्व भारतीयांचे स्वप्न साकार झाले, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ‘हजारो कारसेवक आणि रामभक्तांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली. प्रभू श्रीरामाच्या या मंदिरासाठी शतकानुशतके झगडणाऱ्या आणि त्याग करणाऱ्या सर्व कारसेवकांप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

NewsToday24x7

Next Post

खासदार चषक हैंन्डबॉल स्पर्धा में लाखोटीया ‌भुतडा हायस्कूल प्रथम -द्वितीय‌ तृतीय सह पाच चषक जीते

Mon Jan 22 , 2024
*पांच चषकों के साथ कोंढाली लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय सांघिक विजेता*  Your browser does not support HTML5 video. *कोंढाली में मनया गया विजयोत्सव*  कोंढाली :- नागपुर के विभागीय क्रीडा संकुल में आयोजित खासदार क्रीडा महोत्सव के तहत 18 से 20 जनवरी को आयोजित हैंन्डबॉल स्पर्धा में कोंढाली के लाखोटीया ‌भुतडा हायस्कूल हायस्कूल एवं कनिष्ठ महाविद्यालय तथा सी बी एस ई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com