ज्येष्ठ नागरिकांची मतदान जनजागृतीसाठी पदयात्रा

नागपूर :- सिनीयर सिटीजन कौंसिल ऑफ नागपूरतर्फे 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मतदान जनजागृती पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आणि जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरराव खर्चे असतील.

मानेवाडा चौक (रिंग रोड) येथून या पदयात्रेची सुरुवात होईल. पदयात्रा मार्ग हा मानेवाडा चौक ते उदयनगर चौक असा असणार आहे. 6 एप्रिल रोजी मतदान शपथ महोत्सवात सहभागी सदस्यांना सहभाग मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे संयोजक व सचिव सुरेश रेवतकर यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महापालिकेच्या दुर्गानगर शाळेत पालकसभा

Sun Apr 14 , 2024
नागपूर :- नागपूर महापालिकेच्या शारदा चौकातील दुर्गानगर माध्यमिक शाळेत १३ एप्रिल रोजी पालकसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका टेरेसा जॉर्ज होत्या. प्रमुख पाहुणे ममता खुदरे, भारती गजाम, डॉ. वसुधा वैद्य, कृष्णा उजवणे, श्रीकांत गडकरी, रत्ना येळणे, प्रीती पांडे, प्रीती भोयर, सोनल मानकर, नेरीषा चव्हाण उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मनपा शाळेत असणाºया विविध उपक्रमांची माहिती जॉर्ज यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com