संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने कामठी शहराच्या विविध प्रलंबित व रखडलेल्या आवश्यक मागण्यांना पूर्ण करण्यासाठी 11 सप्टेंबर पासून जयस्तंभ चौकात साखळी उपोषण पुकारले आहे.या बेमुद्दत साखळी उपोषण अंतर्गत अर्धनग्न आंदोलन केले त्यानंतर लोटांगण करीत भीक मांगो आंदोलन करण्यात आले उपोषण करून आजचा 15 दिवस राहूनही प्रशासनाकडून कुठलेही दखल घेण्यात आली नव्हती यावर प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषणकर्ते उमेश भोकरे यांनी आज साडे अकरा वाजे दरम्यान कामठी येथील ऑरेंज सिटी टाऊनशीप समोरील नाग मंदिर मागील भव्य मोबाईल टॉवर वर चढून विरुगिरी केली यावर मागण्यासंदर्भात लिखित स्वरुपात उत्तर प्राप्त होई पर्यंत व समाधान होई पर्यंत टॉवर खाली ऊतरणार नाही असा दम ठोकत टॉवर खाली उतरनार नसल्याचे सांगितले .मात्र दरम्याम यांना खाली उतरवीण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होत प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती .
विरुगिरी ची माहिती कळताच एसडीओ संजय पवार, तहसीलदार अक्षय पोयाम,मुख्याधिकारी संदीप बोरकर,एसीपी संतोष खांडेकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक भिताडे आदी पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणून विरुगिरी करणाऱ्या आंदोलन कर्त्याला मोबाईल टॉवर वरून खाली उतरविण्यासाठी मोबाईल वर संपर्क साधून संवाद साधला मात्र समजूत न निघाल्याने प्रशासनाला अपयश प्राप्त झाले होते व विरुगिरी कायम होती.अखेर प्रशासनाने यातील बऱ्याच मागण्या पूर्ण केल्याचे सांगितल्याने तब्बल 9 तास विरुगिरी केल्या नंतर रात्री 8 वाजता विरुगिरी करणारे उमेश भोकरे टॉवर खाली उतरले व प्रशासनाला टॉवर वर चढुन विरुगिरी करणाऱ्या उमेश भोकरे ला खाली उतरवीन्यात यशप्राप्त झाले तर दुसरीकडे उपोषणकर्त्याच्या बऱ्याच मागण्या पूर्ण केल्याने त्यात ऊत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
हे विरुगिरी उमेश भोकरे यांनी जयस्तंभ चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे पुनर्रचना करून सौंदर्यीकरण करणे,भूमिगत गटार योजनेतील आर्थिक अनियमितता करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाही करण्यात यावे,कामठी शहरातून गडप करण्यात आलेले औद्योगिक वसाहत ची पुनर्रचना करण्यात यावे,कामठींतील प्रस्तावित क्रीडा संकुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे, कामठी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन नविन बाजारपेठ राजश्री छत्रपती शाहू महाराज रविवार बाजार सुरू करण्यात यावा.नागपूर जिल्ह्यातील मंजूर वैद्यकीय महाविद्यालय कामठी शहरात प्रस्तावित करावा अथवा येथे 500खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय मंजूर करण्यात यावा कामठी शहरातील शासकीय जमिनीवर शासन प्रशासनामार्फत बालोद्यान निर्माण करण्यात यावे,कामठी शहरातील लीज प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यात यावा. कामठी शहरात विभिन्न सार्वजनिक ठिकाणी स्त्रीयाकरिता स्वतंत्र सार्वजनिक शौचालय तयार करण्यात यावे,कामठी शहरातील पत्रकारांसाठी तालुका पत्रकार भवन निर्माण करण्यात यावे,कामठी शहरात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कलावंतासाठी सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात यावी या प्रलंबित व रखडलेल्या मागण्यांना पूर्ण करण्यासाठी करण्यात आले.तसेच विरुगिरी करणारे उमेश भोकरे यांनी मागील सात वर्षांपूर्वी कामठी नगर परिषद कार्यालय परिसरातील पाण्याच्या टंकी वर चढून विरुगिरी केली होतो हे इथं विशेष!