पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात वाळू तस्कराचा बंदुकीच्या गोळ्या झाडून खून..

नितीन लिल्हारे, प्रतिनिधी 

तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकावर थरार..

पोलिसांनी केले आरोपीं अटक.

 मोहाडी :- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री असुन देखील जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झाली नसल्याची अशीच घटना तुमसर तालुक्यातील सराईत गुंड असलेल्या नईम सिराज शेख खान (५०) वर्ष यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याची घटना गोबरवाही रेल्वे फाटक जवळ सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.

भंडारा येथील सभेत गुन्हेगारी, अवैध वाळू व गो तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारेच जर रेती तस्कर, हत्यारे, व अवैध व्यवसायीकांना पाठीशी घालत असतील तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला पोलीस विभाग गंभीर्याने घेत नसल्याचे मागील वर्षभरापासून दिसून येत आहे.

कुख्यात गुंड व वाळू तस्कर नईम सिराज शेख खान, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीने पाठलाग करीत गोबरवाही रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे वाहने थांबले होते, त्यांमध्ये मृतक व त्याचा साथीदार चारचाकी वाहनांमध्ये बसला होता. दरम्यान पाठीमागून सिनेमा स्टाईलने गाडीवरून उतरून आरोपींनी बंदुकीतून नईम सिराजवर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर मुख्य आरोपी फरार झाले होते, त्या चारही आरोपीला दोन तासातच पोलिसांनी गाडी सह हेटी गावात ताब्यात घेण्यात यश मिळाले. हत्याकांडाचा मुख्य आरोपी संतोष दहाटने आपल्यावर झालेल्या हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी नईम शेख खानचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. तडीपार असलेला कुख्यात गुंड संतोष दहाटने आपल्या नागपूर येथील सात आरोपी मित्रांसोबत मिळून हे हत्याकांड घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन वर्षांपूर्वी मृतक नईम शेखने तडीपार गुंड संतोष दहाटवर गोळीबार केला होता. त्यात संतोष दहाट वाचला. तेव्हापासून तो नईम शेखच्या मागावर होता. आज संधी मिळताच त्याने नईम शेखचा ‘गेम’ केला. भंडारा पोलिस मुख्य आरोपी संतोष दहाटचा शोध घेत आहेत.

तुमसर शहरात वर्षातून एक दोनदा मंर्डर खून अशा घटना होत असतात यात काही अपवाद नाही. जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांचा गुन्हेगारावर वचक नसल्याची प्रचिती समोर येत आहे.

घटनेच्या अनेक तर्कवितर्क निघत आहे, खून का बदला खून झाला असल्याचे रेती तस्कर व गुन्हेगारी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.

गुन्हेगारी वाढविण्यासाठी पोलीस विभागच जबाबदार असल्याचे सर्व सामान्य लोकांकडून बोलले जात आहे. हा नईम खुलियाम रेती तस्कर करीत होता पोलीस व तहसीलदार किंवा इतर अधिकाऱ्यांना घाबरत नव्हता आणि पत्रकार सुद्दा यांच्या विरोधात बातमी लिहायला हिम्मत करत नव्हता. असे अनके रेती तस्कर तुमसर सराईत आहेत , गुन्हेगारी व रेती तस्कर यांच्यावर अंकुश तरी लावणार कोण अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा नईम वाळू तस्करांचा मोरक्या झालेला विरोधी तस्कराने याचा ‘गेम’ केला.

गोळीबारात दोघेही जखमी झाले होते,

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. नईम खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर गाडीत बसलेला एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक लोहित मतांनी यांनी घटनास्थळ गाठले. गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसर शहर गँगवारसाठी सुप्रसिद्ध आहे. या अगोदरही तुमसरात बरेचदा बंदुकीतून गोळीबार करून आणि धारदार शस्त्राने हत्या झालेल्या आहेत. यात पुन्हा एका हत्याकांडाची भर पडली. आजच्या या थरारा नंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगारी व पोलिस विभागा विरुद्ध काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागुन आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन

Tue Sep 26 , 2023
– ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी मुंबई :- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंह पनवर, ऐश्वर्यसिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com