जिल्हाधिकारी पदाचा प्रभार विजय भाकरे यांच्याकडे

• लोकाभिमुख प्रशासनावर भर देणार

– शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचे निर्देश

गडचिरोली :- जिल्हाधिकारी श्री संजय दैने २० जून पर्यंत रजेवर असल्याने जिल्हाधिकारी पदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

विजय भाकरे यांनी आज दिनांक १० जून रोजी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. लोकाभिमुख प्रशासनावर भर देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी भाकरे यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर खरीप पिक कर्ज वाटप, तसेच बियाणे, खते व फवारणी औषध उपलब्धतेचा आढावा घेतला.

शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भाकरे यांनी दिले असून तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तक्रार निवारणाची जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

24 तासाच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करा-खासदार श्यामकुमार बर्वे.

Wed Jun 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत तहसीलदार, मुख्याधिकारी मुख्यालय सोडू नका- खासदार श्यामकुमार बर्वे कामठी ता प्र 11:-कामठी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिकीय बिघाडामुळे शहरातील काही भागात मागील पाच दिवसापासून पाणीपुरवठा होत नसून भर उन्हाळ्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . नागरीकांच्या ह्या समस्येला गांभीर्याने घेत नागरी हितार्थ जनसेवक म्हणून नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com