जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हहीत, प्लॉट नं. ०५, बालाजी नगर विस्तार येथे राहणारे फिर्यादी रमेश श्रीधर नेहते, वय ८० वर्षे, हे व त्यांची पत्नी वॉकींग करून घरी परत आले व घरात गेले असता, अचानक एक अनोळखी २५ ते ३५ वयोगटातील आरोपी याने फिर्यादीचे घरात येवुन मुख्य दाराची कडी लावून बंद केली व एका लोखंडी हातोडीने फिर्यादीचे डोक्यावर प्रहार केला, तसेच फिर्यादीची पत्नी मध्ये आली असता, त्यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र किंमती ६०,०००/- रू जबरीने हिसकावून घेतले, व दार उघडुन पळुन गेला. जख्मी फिर्यादी यांचा उपचार करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३९४, ४५२, भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा, युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील आरोपी हा हिंगणा परिसरात फिरत आहे अशा खात्रीशीर गोपनीय माहिती वरून तसेच तांत्रिक तपास करून, सापळा रचुन आरोपी नामे देवेंद्र नारायण सोनसारवे, वय ३६ वर्ष, रा. एलॉ. नं. २४, वसंत नगर, अजनी. ह.मु. टाईप-२ क्वॉ. नं. १८२, सि.आर.पी.एफ कॅम्प, हिंगणा, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्याने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली हिरोहंक कंपनीची मोटर सायकल क. एम.एच. ४० ए. एन. ०७९० किंमती अंदाजे एकुण ८०,०००/- रू. ची तसेच मोटोरोला कंपनीचा मोबाईल किंमती १०,०००/- रू या जप्त करण्यात आला आहे.. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करीता अजनी पोलीसांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, पोनि रमेश ताले, पोउपनि अविनाश जायभाये, पोहवा सुनिल ठवकर, रोशशत तिवारी, अतुल चाटे, नापोअं. देवेंद्र नवघरे, स्वप्निल अमृतकर, संदीप मावलकर, सत्येंद्र यादव यांनी केली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मिसींग मोबाईल धारकांना मोबाईल सुपूर्द

Mon Apr 1 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत वेगवेगळ्या तकारदारांनी त्यांचे मोबाईल फोन मिसींग झाले बाबत तकारी दिल्या होत्या. लकडगंज पोलीसांनी तक्रारदारांकडुन मोबाईल बाबत सविस्तर माहिती घेवुन एकुण १५ वेगवेगळया कंपनीचे मोबाईलचा शोध घेवुन मोबाईल प्राप्त केले. दिनांक ३१.०३.२०२४ रोजी तक्रारदरांना पोलीस ठाणे लकडगंज येथे बोलावुन त्यांना त्यांचे मोबाईल मिळाल्या बाबत माहिती देवून सर्व तक्रारदरांना त्यांचे मोबाईल वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com