रमानगरात अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या महिलेला नागरिकांनी खुद्द पकडून दिले पोलिसांच्या स्वाधीन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मागील एक महिन्याच्या कालावधीत सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरत असलेल्या मुले पळविण्याच्या खोट्या माहितीतुन सर्व नागरिकात एक भीतीमय वातावरण पसरले होते या प्रकाराला अफवा असल्याचे साध्य करून नागरिकांची मानसिकता बदलण्यात काही दिवसांचा काळ लोटत नाही तोच मागील आठवड्यात जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील जुनी खलाशी लाईन परिसरात एका अल्पवयीन मुलीची पळवणूक करण्याचा प्रयत्न फसल्याच्या घटनेवरून झारखंड रहिवासी आरोपीस नागरिकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते मात्र तो आरोपी प्रोफेशनल गुन्हेगार सवयीचा नसून दारूच्या नशेत तसा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येते त्यावरून आरोपी तरुण हा मुले पळविणाऱ्या टोळीमधला नसल्याचे सांगण्यात येते तर आज दुपारी 12 दरम्यान नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील रमानगर येथे कुंभारे कॉलोनी रहिवासी महिला ही आपल्या चार वर्षीय मुलीचा बोट पकडून खाजगी दवाखान्यात घेऊन जात असता एक 60 वर्षीय महिला ही त्या चार वर्षीय बालिकेला पळवून नेत असल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असता वेळीच नागरिकांनी मदतीची धाव घेऊन सदर वृद्ध महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले यातही ही वृद्ध महिला वेडसर वृत्तीची असून मुले पळवून नेणाऱ्या सवयीच्या आरोपी नसल्याचे समजते.पोलिसांनी सदर वृद्ध महिलेची केलेल्या चौकशीत वेडसर दिसली असता तिची वैद्यकीय तपासणी केली असता शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारिने सदर वृद्ध महिला मनोरुग्ण असल्याचे सांगितल्यावरून तिला मनोरुग्ण रुग्णालयात हलविण्यात आले.

मुले पळविणारी टोळी सक्रीय झाल्याच्या अफवांना बळी पडू नका – पी आय संतोष वैरागडे

एकीकडे सोशल मीडियावरून पसरत असलेल्या मुले पळविण्याच्या खोट्या संदेशाना बळी पडू नका, मुले पळविनारी टोळी सक्रिय झाली असल्याची चर्चा ही विफल ठरत असून ही खोटी व अफवा पसरवणारी बातमी आहे तेव्हा खोट्या बातम्यांना बळी पडू नका…नुकतेच कामठीत घडलेल्या दोन घटनेतील घटनेत आरोपी मुले पळविणाऱ्या टोळी तसेच त्या गुन्हे वृत्तीचे नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा सावधानता बाळगा व अश्या अफवा पसरवणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी केले आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोरवाल महाविद्यालय येथे पोस्टर स्पर्धेचे आयोजन..

Mon Oct 17 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-  सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय,कामठी येथे मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या पोस्टर स्पर्धेत बीएससी व एम एससीच्या एकूण ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या पोस्टर स्पर्धेचे परीक्षण डॉ.शालिनी चहांदे असोसिएट प्रोफेसर हेड डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिस्ट्री, डॉ.जयश्री थावरे असोसिएट प्रोफेसर हेड डिपार्टमेंट ऑफ बॉटनी आणि डॉ. आलोक आर.राय असोसिएट प्रोफेसर हेड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com