ब्रेल लिपीतील मतदान पत्रिकेची पडताळणी

गडचिरोली :- अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आलेल्या मतदान पत्रिकेची (बॅलेट पेपर) पडताळणी ब्रेल लिपी अवगत असलेल्या अंध प्रतिनिधींकडून नुकतीच करुन घेण्यात आली.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) अनिमेष कुमार पराशर, निवडणुक निर्णय अधिकारी संजय दैने यावेळी उपस्थित होते. अंध प्रतिनिधी मारोती सोमाजी भारशंकर, कुंदा सखाराम पाल आणि पुरुषोत्तम पांडूरंग किरंगे यांनी या ब्रेल लिपीतील मतदान पत्रिकेचे वाचन केले.

12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या अनुषंगाने अंध मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान पत्रिका ब्रेल लिपीमध्ये छपाई (तयार) करण्यात आली आहे. सदर मतदान पत्रिका ब्रेल लिपीमध्येच आहे किंवा नाही याबाबत ब्रेल लिपी अवगत असलेल्या अंध मतदार / अंध प्रतिनिधी यांचेकडून निवडणूक निरीक्षक पराशर यांचे समक्ष पडताळणी करण्यात आली.

जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निरिक्षक यांनी ब्रेल लिपी पडताळणीबाबत समाधान व्यक्त करुन उपस्थित अंध प्रतिनिधींनी या निवडणूक कार्यात केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वांच्या साथीने यंदा होणार नागपूरचा “खऱा” विकास

Fri Apr 12 , 2024
नागपूर :- नागपूर लोकसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागलेले असून दररोज अनेक संघटना इंडिया घाडातीली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करत आहे. याच मालिकेत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनीयन, यादव समाज, कंत्राटी कामगार, असंगठित, फुटपाथ विक्रेते, ऑटो व ई-रिक्षा चालक, अधिवेशन कामगारांच्या संगटनांनी आपले समर्थन जाहीर केले आहे. असंघठीत कामगारांचे संगठनही भापज विरोधात मैदानात कंत्राटी कामगार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com