आर्वी – सदर व्यक्ति सादिक बाशा अब्दुल मलिक वय 46 वर्ष काम मैनेजर (त्रिनेव्हा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी आर्वी ते वर्धा रोड) यानी पुलिस स्टेशन आर्वी येथे रिपोर्ट दिला कि दिनांक 12/08/2021 ते 14/08/2021 चे रात्रि दरम्यान वर्धा ते आर्वी सिमेंट रोड कामावर असलेले त्रिनेव्हा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे कोबल्को एक्स 04 पोकलॅड मशीनमधुन 270 लिटर डिझेल क़ीमत .25920 ₹ चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरल्या बाबत तक्रार दिली असा फिर्यादी तोंडी रिपोर्ट देऊन पोलीस स्टेशन आर्वी येथे अप. क्रम 652/2021 कलम 379 भादवी या गुन्ह्याची नोंद करण्यात आला .
सदर गुन्ह्याचे तपास सुरू असताना मुखबीर चे खात्रीशीर खबरे वरून माहिती मिळाली की त्रिनेव्हा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे कोबल्को एक्स 04 पोकलॅड मशीनचा चालक नामे दिनेश कुमार चौधरी राहणार ता. लालबाग ,जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश यानेच त्याचे ताब्यामधे असलेले त्रिनेव्हा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे कोबल्को एक्स 04 पोकलॅड मशीन असताना दि.12/08/2021 ते 14/08/2021 चे रात्रि दरम्यान डिझेल चोरी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर आर्वी पोलीस त्यास ताब्यात घेण्यास साठी टीम जिल्हा रायपुर, राज्य छत्तीसगड़ येथे जाऊन यांनी सदरचे घटनास्थळ गाठून सदर आरोपी यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन त्यास आर्वी येथे आनुन गुन्हयात चोरी गेलेला डिझेल मुद्देमाल हस्तगत केले व गुन्हा उघडकीस आनला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर साहेब, मा.अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे साहेब, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्री भानुदास पिदुरकर साहेब, यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे शोध पथकातील रंजीत जाधव, अनिल वैद्य ,सुनील मळनकर, सतीश नंदागवळी, प्रदीप दातारकर ,सर्व पोलीस स्टेशन आर्वी व सायबर सेल वर्धा येथील अनुप कावळे,अक्षय राऊत, विशाल मडावी यांनी केली.