– कचरा गाडी चे प्रतीक्षेत रामटेकवासी.
– आरोग्याची व स्वच्छतेची बाब लक्षात घेता ,अतिरिक्त गाड्यासह घंटा गाडी उद्या पासून सुरू होणार – मुख्याधिकारी अर्चना वंजारी
रामटेक :- शहरात मागील चार दिवसांपासून कचरा घेण्यासाठी गाडी येत नाही , त्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचल्याचे दिसत आहे.
शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे, मात्र नगर पंचायत बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा परिसरात आहे…
घंटा गाड्यात कचरा टाकणारे नागरिक गाडी येईल मग कचरा टाकू असा विचार करुन दारात कचरा गोळा करुन वाट पाहत आहेत, पण गाड्याच बंद झाल्याने कचरा टाकणार कोठे? असा सवाल नागरिक करीत आहेत…..घनकचरा व्यवस्थापन हे काम अचानक सोडू शकत नाही. शेवटी नागरिकांचा आरोग्याचा सवाल आहे.. आणि प्रशासना समोर पण प्रश्न असतो एकदम वेळेवर नियोजन होत नसते.आरोग्याची व स्वच्छतेची बाब लक्षात घेता ,अतिरिक्त गाड्यासह घंटा गाडी उद्या पासून सुरू होणार असल्याचे मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी सांगितले.
1 महिण्याआधी सूचना न देता नागरीकांच्या आरोग्याची व स्वच्छतेचा विचार न करता अचानक घंटा गाडी बंद करण्याचे पत्र नगर परिषद ला देवून वेठीस धरणे हे कितपत योग्य.गाड्यांच्या चाब्या न देणे याकरिता नागरिकांना होणारा त्रास प्रशासन सहन करणार नाही. आरोग्याची व स्वच्छतेची बाब लक्षात घेता जर त्वरित गाड्या च्या चाब्या दिल्या नाही तर पुढील कारवाईस समोर जावे लागेल. असे देखील मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी सांगितले….
रामटेक नगर परिषद चे नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांच्याशी विचारणा केली असता.
” शारदा महिला मंडळ हिवरा बाजार या संस्थेकडे घनकचरा व्यवस्थापनाचे कामे आहे. मागील चार वर्षापासून त्यांचा कडे कंत्राट आहे. परंतु काही महिन्यांपासून त्यांची कचरा नियोजन पद्धत बरोबर नाही आहे. त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी शारदा महिला मंडळ संस्थेने दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांचे पगार थांबविण्यात आले. या संस्थेला नगर परिषद ने दोन तीन गाड्या सुद्धा दिल्या. त्यांनी नगर परिषद ला आम्ही काम बंद करतो आहे असं पत्र दिलं. त्या सोबतच गाडीच्या चाव्या सुद्धा त्यांनी नगर परिषद ला परत केल्या नाहीत.
सलग 5 दिवसांपासून नागरिकांना याचा त्रास होतो आहे. या संदर्भात पोलीस स्टेशन रामटेक येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.असे नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांनी सांगितले….