– उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलिसांचा गौरव
– अपर पोलिस महासंचालकांच्या हस्ते बक्षीस
नागपूर – लोहमार्ग पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा धागा नसताना अतिशय अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावला. तसेच संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या विशेष आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी अपर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा गौरव करण्यात आला. मुंबई येथील अपर पोलिस महासंचालक कार्यालयाच्या सभागृहात रोख, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी लोहमार्ग पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक वैशाली qशदे उपस्थित होत्या.
आझाद qहद एक्सप्रेसने प्रवास करणाèया एका महिलेची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना ७ फेब्रुवारी २०२२ ला धावत्या रेल्वेत घडली. या प्रकरणाचा कुठलाच सुगावा नसताना पोलिसांनी हरिद्वारमधून आरोपीला अटक केली. तसेच साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तोतया जवान बुलेट चोरालाही होशंगाबाद येथून हुडकून काढले. एका अॅक्टिव्हा चोराच्या छिंदवाडा येथे मुसक्या आवळल्या तसेच ३५ वर्षांपासून फरार आरोपीला मोठ्या शिताफीने पकडले. या चारही प्रकरणात पोलिसांकडे कुठलाच धागादोरा नव्हता. पोलिसांचे कौशल्य आणि पंटरची मदत मिळाल्याने आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या. विशेष म्हणजे अल्पावधीतच या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले. यात पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलिस हवालदार महेंद्र मानकर, अविन गजवे, विनोद खोब्रागडे, श्रीकांत धोटे, गिरीश राऊत, अमित त्रिवेदी, मंगेश तितरमारे, चंद्रशेखर मदनकर, अमोल हिंगने , प्रशांत उजवणे, रविकांत इंगळे, चंद्रभान ठाकूर, दीपक गवळीकर आणि बबन सावजी यांचा समावेश होता.