रणाळ्यात 13 हजार 300 रुपयांची घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील फ्रेंड्स कॉलोनीत एका कुलुपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने 6 हजार 100 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व नगदी 7 हजार 200 रुपये असा एकूण 13 हजार 300 रुपयांची घरफोडी केल्याची घटना गतरात्री साडे आठ दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी राजू अब्दुल शेख वय 49 वर्षे रा फ्रेंड्स कॉलोनी रणाळा ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हे 3 जून ला आपल्या परिवारासोबत त्यांचे भावाचे मुलीचे लग्न समारंभात सहभागी होण्यास गेले व दुसऱ्या दिवशी रात्री 8 दरम्यान घरी परतले असता घरी चोरी झाली असून घरातील लोखंडी कपाटातील ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने किमती 6100 रुपये व नगदी 7200 रुपये असा एकूण 13 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला असता यासंदर्भात पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NewsToday24x7

Next Post

मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सत्तांतर झाले, खड्डे बुजलेच नाही, खड्ड्यांचे आकार मात्र वाढले, कोदामेंढीतील गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. 

Sun Jun 4 , 2023
कोदामेंढी :- येथील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सत्तांतर झाले. तीन वर्षांपूर्वी अरोली -कोदामेंढी जि.प.क्षेत्र तर सहा महिन्यापूर्वी कोदामेंढी ग्रा.पं.भाजपा कडून कांग्रेस ने आपल्या ताब्यात घेतले. मुख्य रस्त्यांवरील खड्डे हा प्रचाराचा एक मुख्य मुद्दा होता. मात्र आजही मुख्य रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असून , उलट त्यांच्या आकार वाढत असून कोदामेंढीतील गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अतिवृष्टी झाली की पिकांची आणि रस्त्याचे मोठ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com