बसपा ने शौर्यदिन साजरा केला 

नागपूर :- 205 वर्षांपूर्वी अमानवीय पेशवाई संपवणाऱ्या महार बटालियनच्या 500 शूरवीर सैनिकांना नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, महिला नेत्या वर्षा वाघमारे, माजी मनपा पक्ष नेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

हा अभिवादन कार्यक्रम बालाजी नगरातील त्रिशरण बुद्ध विहार व भदंत आनंद कौशल्यायन नगरातील कल्पतरू बुद्ध विहार परिसरात असलेल्या भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाच्या प्रतिकृतीला अभिवादन करून करण्यात आला. याप्रसंगी “भीमा कोरेगाव शौर्यदिन चिरायु हो, पेशवाई संपविणारे शहीद अमर रहे” आदि गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश बसपा चे सचिव पृथ्वीराज शेंडे ह्यांनी भीमा कोरेगावच्या संघर्षाची शौर्य गाथा सांगितली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मीडिया प्रभारी उत्तम शेवडे ह्यांनी केले तर समारोप जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग ह्यांनी केला.

याप्रसंगी प्रामुख्याने युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, योगेश लांजेवार, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, प्रवीण पाटील, राजू चांदेकर, प्रा करुणा मेश्राम, वंदना कडबे, निर्मला धाबर्डे, सहदेव पिल्लेवान, नितीन वंजारी, रोहित वालदे, निरंजन जांभूळे, वासुदेव मेश्राम, संजय सोमकुवर, जगदीश गेडाम, संदीप रामटेके, जितेंद्र पाटील, विलास मून, सिद्धार्थ कांबळे, अरुण शेवडे, राजू रहांगडाले, बालचंद जगताप, राजू घोडेस्वार, राजेंद्र सुखदेवे, पंजाब फुलझेले, तिष्य लांजेवार, अजय डांगे, सुमित जांभुळकर, विद्यार्थी शेवडे, तथागत कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुराबर्डी आश्रम में उमड़ा भक्तों का सैलाब

Mon Jan 2 , 2023
नागपुर :- विश्व जागृति मिशन के तत्वावधान में आचार्य श्री सुधांशु महाराज का शीतकालीन दिव्य सत्संग समारोह 4 से 8 जनवरी के बीच सुरेश भट सभागृह, रेशमबाग में आयोजित किया गया है. इसकी तैयारियों को लेकर अंतिम बैठक का आयोजन रविवार को सुराबर्डी आश्रम परिसर के सत्संग भवन में किया गया. इसमें बड़ी संख्या में गुरुभक्तों ने अपनी उपस्थिति दर्ज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com