नागपुर – तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दित दि. 06.02.2022 चे 22ः25 वा. सुमारास सहा.पो.नि. संदीप अशोक बागुल हे स्टाफसह पेट्रोलींग करीत असता गुप्तबातमीदाराव्दारे मिळालेल्या माहितीवरुन तनविर गेस्ट हाउसचे चौथ्या माळयावरील रूम नं. 7, पो.स्टे.तहसिल, नागपूर येथे दोन पंचासह जावून 1) मो.असलम वल्द मुस्ताक अहमद, वय 32 वर्ष, रा. फारूकनगर प्लाट नं. 47 मैदाना समोर, टेकानाका पो.स्टे.पाचपावली, नागपूर, 2) मोसीन अन्सारी वल्द रौफ अन्सारी, वय 30 वर्ष, रा.कब्रस्तान रोड समाजभवन जवळ, मोमिनपुरा, पो.स्टे.तहसिल, नागपूर, 3) मो.जावेद वल्द मो.अन्सारी, वय 33 वर्ष, रा. अन्सारनगर प्लाट नं. 54 मस्जीदीया स्कुल समोर, मोमिनपुरा पो.स्टे.तहसिल नागपूर, 4) मो.सोहेल वल्द जमिल वय 28 वर्ष, रा.नुरी प्रेस जवळ, मोमिनपुरा, पो.स्टे.तहसिल, नागपूर, 5) अबु हुरयरा वल्द मो.हुसेन, वय 29 वर्ष, 6) मो.साहीद वल्द मो.सगीर, वय 30 वर्ष, रा.अन्सारनगर अब्बुमियॉं मस्जीद जवळ, इस्लाम साठेचे घरा जवळ, मोमिनपुरा पो.स्टे.तहसिल, नागपूर, 7) रिझानु रहेमान उर्फ रिझवान वल्द ऐसानउल्हा अन्सारी, वय 29 वर्ष, रा.प्लाट नं. 23 फारूखनगर, टेका मोहंमदी मस्जीद जवळ, डॉ.आंबेडकर मार्ग पो.स्टे.पाचपावली, नागपूर, 8) अबु दाऊद वल्द अब्दुला अन्सारी, वय 28 वर्ष, रा.आशीनगर सी/ओ.शहीद हाजी यांचेकडे किरायाने टेका चारखंबा चौक जवळ, पो.स्टे.पाचपाचली, नागपूर, 9) इरशाद अहमद वल्द मो.शरीफ वय 32 वर्ष, रा.सी/ओ.आजमभाई यांचे घरी किरायाने पिली नदी टिपू सुलतान चौक, नुरी मेहबुबीया मस्जीद जवळ, पो.स्टे.यशोधरानगर, नागपूर, 10) नौशाद अन्सारी वल्द निषार अन्सारी, वय 30 वर्ष, रा. बकरा मडी गरीब नवाज मस्जीद जवळ, मोमिनपुरा पो.स्टे.तहसिल, नागपूर, 11) मो.शाकीर वल्द मो.जफर वय 28 वर्ष, रा.सी/ओ.सरकुभाई यांचे घरी किरायाने फारूखनगर, टेका पो.स्टे.पाचपावली, नागपूर, 12) इजाज अन्सारी वल्द अब्दुल रशिद, वय 35 वर्ष, रा.पिली नदी वांजरा स्वतःचे घर पो.स्टे.यशोधरानगर नागपूर, 13) मुनिब अन्सारी वल्द सदरूद्दीन अन्सारी, वय 22 वर्ष, रा. मोमिनपुरा, कब्रस्तान गेट जवळ, पो.स्टे.तहसिल, नागपूर, 14) सगिर अहमद वल्द निजामुद्दीन अहमद, वय 33 वर्ष, रा.कमर कॉलोनी, स्वतःचे घर गुरूनानक कॉलेजचे पाठीमागे, पो.स्टे.कपीलनगर, नागपूर, 15) मो.नियाज वल्द मो.मुस्ताक, वय 35 वर्ष, रा. मोमिनपुरा, कब्रस्तान गेट जवळ, मुक्तारबाबा हाउसचे बाजुला पो.स्टे.तहसिल, नागपूर आणि 16) मेराज अहमद वल्द मो.कमरूद्दीन वय 32 वर्ष, रा.प्लाट नं. 40 फारूखनगर टेका पो.स्टे.पाचपावली असे जुगारी इसम स्वतःच्या आर्थीक फायदयाकरीता 52 तासपत्यावर जुगार खेळतांना समक्ष मिळून आल्यांने त्यांचे जवळून 1) 52 तास पत्ते, 2) नगदी 15,130/-रु., 3) वेगवेगळया कंपनीचे एकूण 16 मोबाईल अंदाजे किं. 1,64,000/-रु., 4) सुजूकी कंपनीची ब्रर्गमेन दुचाकी वाहन क्र. एम.एच.-49-बी.क्यु.-6604 अं.किं1,20,000/-रु. 5) हिरो स्प्लेंडर दुचाकी वाहन क्र. एम.एच.-40-सी.-9078 अं.किं.30,000/-रु. असा एकूण 3,29,130/-रु.मुद्देमाल मिळून आल्याने घटनास्थळ जप्ती पंचनामा कारवाई करण्यात आली असून त्यांचे हे कृत्य कलम 4, 5 महा.जुगार कायदा प्रमाणे होत असल्यांने पो.स्टे. तहसिल येथे आरोपींताविरुद्ध कलम 4, 5 महा.जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नविनचंद्र रेड्डी यांचे निर्देशान्वये परिमंडळ क्र. 3 चे पोलीस उपायुक्त गजानन शिवलींग राजमाने, सहा.पोलीस आयुक्त (कोतवाली विभाग) संजय सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. तहसिलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) श्री.बबन येडगे, सपोनि/संदीप बागुल, सपोउपनि संजय दुबे, नापोशि प्रशांत चचाने, नापोशि पुरूषोत्तम जगनाडे, नापोशि अनंत नान्हे, पोशि रंजीत बावणे मपोशि निर्मला यांनी केली आहे.