नागपूर :- विदर्भातील पथॉलॉजी डॉक्टरांची संघटना असलेल्या विदर्भ असोसिएशन ऑफ पथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट (व्ही.ए.पी.एम.) च्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवार, 5 मे रोजी सकाळी 10 वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित करण्यात आला आहे.
व्ही.ए.पी.एम. च्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. मनीषा मिश्रा ह्या त्यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीसोबत पदाची शपथ घेतील. यावेळी डॉ आनंद पाठक हे मुख्य अतिथि म्हणून उपस्थित राहतील. सदर समारंभाला संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.