अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने अनोळखी इसमाचा मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना रेल्वे मार्गावरील महावीर नगर ते सईद नगर रेल्वे रुळावर अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने एका 40 ते 50 वर्षे वयोगटातील इसमाचा मृत्यु झाक्याची घटना काल सकाळी सात वाजता निदर्शनास आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणी साठी मृतदेह कामठी च्या श्वविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोरवाल महाविद्यालयाच्या ग्रामोन्नती सेलतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त चर्चासत्र

Thu May 2 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील दत्तक ग्राम अभियानांतर्गत ग्रामोन्नती सेल आणि हेल्थ अवरनेस सेलच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे (कामगार दिवस) औचित्य साधून ग्राम घोरपड येथे बँक कर्ज घेतांना ग्राहकांना येणाऱ्या समस्या आणि समाधान विषयावर एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दत्तक ग्राम अभियान व ग्रामोन्नती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com