– विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या प्रयत्नाला यश.
कन्हान :- स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी अपलोड करताना आधार मिसमॅच संदर्भातील अडचणीवर मात करीत तहसिलदार पारशिवनी व गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रयत्नाने शाळानिहाय शिबिर सुरूवात होऊन कांद्री-कन्हान येथील धर्मराज शैक्षणिक परिसरात दोन दिवस आधार अपडेट शिबीर संपन्न झाले.
धर्मराज शैक्षणिक परिसरातील धर्मराज प्राथमिक व विद्यालय कांद्री-कन्हान येथे आधार अपडेट शिबिरात जागृती रामटेके, संदीप रामटेके, गौरव उताणे या कामी सहकार्य केले आहे. आधार कार्ड नोंदणी कर्मचाऱ्यांचे कन्हान केंद्रप्रमुख लता माळोदे, धर्मराज विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश साखरकर, धर्मराज प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बढीये, नेहा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश खोब्रागडे यांनी स्वागत केले. विदर्भ मुख्याध्यापक संघाने आधार संदर्भात पालक व विद्यार्थी यांची होरपळ थांबविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी वंदना हटवार, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोखंडे यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार प्रशांत सांगळे यांना विनंती केली होती. या मागणीची दखल घेत (दि.१५) एप्रिल २०२३ पासुन आधार अपडेट शिबीराची सुरूवात होऊन धर्मराज शैक्षणिक परिसरात (दि.१८) व (दि.१९) असे दोन दिवस आधार अपडेट शिबिर घेण्यात आले आहे. यात एकुण ८५ विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आले . शिबिराचे शाळानिहाय नियोजन करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक संघाच्या वतीने खिमेश बढिये यांनी आभार व्यक्त केले. धर्मराज प्राथमिक शाळेत आधार अपडेट करिता शाळेतील शिक्षक भिमराव शिंदे, मेश्राम, राजु भस्मे, अमित मेंघरे, किशोर जिभकाटे, चित्रलेखा धानफोले, शारदा समरीत, हर्षकला चौधरी, अर्पणा बावनकुळे, प्रिती सुरजबंसी, पूजा धांडे, कांचन बावन कुळे, वैशाली कोहळे आदीनी मोलाचे सहकार्य केले.