नागर्जुना अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 26 आणि 27 मे रोजी

नागपुर :- मैत्रेय एज्युकेशनल सोसायटी च्या, “नागर्जुना इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग, टेकनलॉजि अँड मॅनेजमेंट,” तर्फे , “International conference on multidisciplinary approach in technolgy and social development, ICMTSD -2023, चे आयोजन दि.२६ व २७ मे २०२३ रोजी करण्यात आलेले आहे. ह्या परिषदेत देश विदेशातील विविध विषयावर संशोधन पर १८६ पेपर आले असून १५० संशोधक हायब्रीड मोड मध्ये उपस्थित राहतील. नागपूरच्या उष्णतेचा अंदाज घेऊन ८५% संशोधकांनी ऑनलाइन मोडमध्ये शोध निबंध वाचण्यास प्राधान्य दिले आहे. उर्वरीत देश विदेशातील १५% संशोधक प्रत्येक सहभाग घेणार आहेत. त्यावेतिरिक्त शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील अंदाजे ३०० प्रतिनिधी ह्या परिषदेचा लाभ घेणार आहे. अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, विज्ञान, कृषिविज्ञान, सामाजिक शास्त्रे, विधी, कला, वाणिज्य, पत्रकारिता, हुमानिटीज व इतर क्षेत्रातील शोध पत्र प्रस्तुत होणार आहेत. नागपूर व देश विदेशातील इच्छुकांना फेसबुक लाईव्ह व युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून परिषदेचा लाभ घेता येईल. त्याकरिता www.nietm.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सीताबर्डी मेट्रो स्टेशन जवळील बुटी मॉल येथून सकाळी ठीक ७:३० वाजता बसची व्यवस्था केली आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन दि.२६ मे रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ.मनोज डायगव्हाणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संचालक डॉ.संतोष देवसरकर, मैत्रेय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि.मदन माटे, सचिव अजय वाघमारे परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय केलो व निमंत्रक डॉ. मुरलीधर रहांगडाले यांच्या उपस्थितीत होणार आहे. न्यू यॉर्क अमेरिका येथील मॉर्गन स्टॅन्ली चे व्हाइस प्रेसिडेंट धर्मेंद्र अवसरमोल यांच्या बीज भाषणाने परिषदेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर विविध १४ सत्रांच्या माध्यमातून पेपर प्रस्तुत होणार आहेत. सदर परिषदेचा सर्व इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.कुशल यादव, प्रा. रसिक उपाद्याय, प्रा.अतुल आकोटकर, प्रा. अश्विनी वालदे, प्रा.स्वाती सोनटक्के या संनव्यय समितीतर्फे या पत्रपरिषदे मार्फत करण्यात येत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com