पोरवाल महाविद्यालयाच्या ग्रामोन्नती सेलतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त चर्चासत्र

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील दत्तक ग्राम अभियानांतर्गत ग्रामोन्नती सेल आणि हेल्थ अवरनेस सेलच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे (कामगार दिवस) औचित्य साधून ग्राम घोरपड येथे बँक कर्ज घेतांना ग्राहकांना येणाऱ्या समस्या आणि समाधान विषयावर एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दत्तक ग्राम अभियान व ग्रामोन्नती सेलचे समन्वयक डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश्य स्पष्ट करतांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी केलेल्या सुधारणा व तरतुदींची माहिती दिली.

चर्चा सत्राचे मुख्य मार्गदर्शक आशिष दुपारे, प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कामठी, यांनी बँक कर्ज घेतांना ग्राहकांना येणाऱ्या विविध समस्यावर चर्चा करतांना शेतकऱ्यांना बँकेकडून दिले जाणारे विविध कर्ज व योजनांची माहिती दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बँकेत शिष्यवृत्ती जमा करतांना व काढतांना घ्यायच्या दक्षतेवर प्रकाश टाकतांना उपस्थितांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीत. हेल्थ अवरनेस सेलचे समन्वयक डॉ. जयंत कुमार रामटेके यांनी शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना लवकर व कमी कागदी कार्यवाहीत कर्ज मिळण्याची अपील केली. ग्रामपंचायत घोरपडच्या सरपंच तारा बलवंत कडू यांनी शेतकऱ्यांसाठीच्या विविध कर्ज योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाही अशी खंत व्यक्त केली. कार्यक्रम अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात बँकेचे ऑनलाईन व्यवहार करतांना सावधगिरी बाळगण्याचे आव्हान केले. याप्रसंगी डॉ. दिपक भावसागर, डॉ. विनोद शेंडे, प्रा. अमोल गुजरकर, जिल्हा परिषद घोरपड शाळेचे शिक्षक राकेश मांडवकर, जयश्री गेडाम आणि बहुसंख्येने विद्यार्थी व घोरपड गावाचे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रांजल चंद्रिकापुरे व आभार समीक्षा बादुले ने मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1 मे कामगार दिनी मजूर वर्ग कामाच्या प्रतीक्षेत,चावडी चौकात कामगारांचा ठिय्या

Thu May 2 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुदधा 1 मे हा कामगार दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व साधून कामठी तालुक्यात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा करण्यात आला मात्र याच दिवशी आर्थिक परिस्थितीने बिकट असलेले व मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर वर्गातील पुरुष महिलांना जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील चावडी चौकात दुपारचे बारा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com