आयआयटी टेकफेस्टमध्ये विद्यापीठाची चमू द्वितीय

बेंगलुरु येथे पार पडली विभागीय फेरी

नागपूर :- आयआयटी बॉम्बेच्या वतीने आयोजित ‘टेकफेस्ट’ या आशियातील सर्वात मोठ्या विज्ञान व तंत्रज्ञान स्पर्धेतील विभागीय फेरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. सोबतच आयआयटी बॉम्बे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी विद्यापीठाच्या चमूची निवड झाली आहे.

प्रामुख्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा दबदबा असणाऱ्या आयआयटी बॉम्बेच्या टेकफेस्ट स्पर्धेत ग्लोबल अकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजी, बंगळुरू येथे २८ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या विभागीय फेरीत विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. विभागीय फेरीच्या मेश्मेराइझ इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. आयआयटी बॉम्बेच्या वतीने आयोजित टेकफेस्ट हा आशियातील सर्वात मोठा विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव आहे. या स्पर्धेकरिता ७५ हजाराहून अधिक नागरिकांची उपस्थिती राहते. त्याचप्रमाणे टेकफेस्ट स्पर्धेत २.८ दशलक्षाहून अधिक नागरिक समाज माध्यमांद्वारे सहभागी होतात. टेकफेस्ट महोत्सवात मेश्मेराइझर, रोबोवार्स, कोझ्मोक्लेंच, प्रश्नमंजुषा व अन्य स्पर्धांचा समावेश आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओ. पी. चिमणकर आणि विद्यार्थ्यांचे समन्वयक डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन संघांनी टेकफेस्ट २०२३ च्या मेश्मेराइझ स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. काळ्या पृष्ठभागावर दिलेल्या पांढऱ्या रेषेचे अनुसरण करू शकतो असा प्रत्येक संघाने एक स्वदेशी स्वयंचलित रोबोट बनवायचा होता. टॉप ५ मध्ये जाण्यासाठी लाईन फॉलोअर रोबोटला देखील त्याचे कौशल्य वापरून जटिल चक्रव्यूह सोडवावा लागतो. त्याला १२० सेकंदांपेक्षा कमी वेळेत दिलेल्या दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर शोधणे आवश्यक आहे. पहिल्या संघामध्ये संघ प्रमुख सिद्धेश्वर नागपुरे, संस्कारी खोकले व ध्रुव ढोके यांचा समावेश होता. दुसऱ्या संघामध्ये संघ प्रमुख ऋषिकेश पळसोदकर, प्रियांका टोपीवाला यांचा समावेश होता. या संघाने स्पर्धेमध्ये द्वितीय स्थान प्राप्त केले. बेंगलुरु कर्नाटक येथील ग्लोबल अकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजी येथे २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता विभागीय फेरी पार पडली. भोपाल, इंदौर, मुंबई व बेंगलुरु येथे या स्पर्धेतील विभागीय फेरी घेण्यात आली. देशाच्या विविध भागातील शैक्षणिक संस्था तसेच महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

आयआयटी बॉम्बे येथे अंतिम फेरी

आयआयटी बॉम्बे येथे टेकफेस्ट स्पर्धेतील अंतिम फेरी घेतली जाणार आहे. भोपाल, इंदौर, मुंबई व बेंगलुरु येथे झालेल्या विभागीय फेरीमधील विजेत्या ठरलेले ३-३ असे एकूण ६५ संघ आयआयटी बॉम्बे येथील अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. भौतिकशास्त्र विभागातील या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या इंक्युबेशन केंद्रातील इलेक्टस टेक्नाँलॉजीस स्टार्टअपच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण दिले आहे. या स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांची तयारी करून घेतल्याने हे यश प्राप्त झाले आहे.

NewsToday24x7

Next Post

फीट इंडीया क्वीज मोहीमेमध्ये शाळा व महाविद्यालयांनी नोंदणी करावी

Sat Nov 11 , 2023
भंडारा :- फीट इंडीया क्वीज़ मोहीमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या शाळा व महाविद्यालयाची नोंदणी करण्यासाठी 10 नोव्हेंबर,पर्यत मुदतवाढ फीट इंडीया मोहीमेअंतर्गत न करणाऱ्या शाळांकडून खुलासा मागविण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या शाळांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही अशा शाळांनी दि. 10 नोव्हेंबर, 2023 पर्यंत नोंदणी करावी. ही तारीख शेवटची आहे. शाळा नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर जावून करावी लागणार आहे. यासाठी डेक्सटॉप, कॉम्प्युटर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com