संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीवर आज दिनांक 21 नोव्हेंबर पासून प्रशासक राज आले आहे .कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 27 ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे लोकहितार्थ व प्रशासकिय कामकाज सुरळीत चालविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 35(3) ब च्या अनव्ये 27 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आल्याची माहिती कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी दिली.
यानुसार कामठी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रा. प. सह सोनेगाव राजा व पडसाड ग्रा प च्या प्रशासक पदी विस्तार अधिकारी पंकज लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच वडोदा,भुगाव व जाखेगाव ग्रा. प. प्रशासक पदी विस्तार अधिकारी गोपीचंद कातुरे, शिवणी ,आडका,केम ग्रा प च्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी चंद्रकांत तोडकर, कढोली, भोवरी दिघोरी ग्रा प प्रशासक पदी विस्तार अधिकारी कश्यप सावरकर,भिलगाव, गुमथळा,कापसी बु ग्रा प प्रशासक पदी विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे, सुरादेवी,बिना,खैरी ग्रा प प्रशासक पदी विस्तार अधिकारी विकास लाडे, रणाळा ,तरोडी बु,लिहिगाव ग्रा प प्रशासक पदी विस्तार अधिकारी मनीष दिघाडे, गुमथी,खापा, खसाळा ग्रा प प्रशासक पदी विस्तार अधिकारी शालिनी साखरे, आजनी, आवंढी व गादा ग्रा प च्या प्रशासकपदी ललिता मोहाडीकर या अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत प्रशासक पदावर नियुक्ती केलेली आहे. ही नियुक्ती संबंधित ग्रामपंचायत निवडणूक किंवा सरपंच निवडणूक प्रक्रिया संबंधित यंत्रणेमार्फत सरपंच किंवा उपसरपंच निवडणूक होईपर्यंत तसेच पुढील आदेशापर्यंत असेल असे कळविण्यात आले आहे.एकापेक्षा जास्त प्रशासकपदाची पेलताना मात्र प्रशासकाना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्यामुळे प्रशासकाची तारांबळ होणार आहे हे इथं विशेष!