– अटल आरोग्य कालदर्शिकेचे प्रकाशन करताना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, डॉ गिरीश चरडे, डॉ श्रीरंग वराडपांडे
नागपुर – भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर च्या द्वारा निर्मित अटल आरोग्य कालदर्शिकेचं भारत सरकार चे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते प्रकाशन डॉक्टरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले .यावेळी नागपूर वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, महामंत्री आयुर्वेद तज्ञ डॉ श्रीरंग वराडपांडे आदी डॉक्टर्स उपस्थित होते. आरोग्य कालदर्शिकेची निर्मीती व संकल्पना डाॅ श्रीरंग वराडपांडे यांची असुन कालदर्शिकेत वैद्यकीय आघाडीचे वार्षिक शिबीरउपक्रम ,केंद्राच्या आरोग्य योजना वेबिनार, आरोग्य जनजागृती कार्यक्रम, सेवा क्लिनिक, खासदार हेल्थ कार्ड आदींची माहिती छायाचित्रांसहीत दिलेली आहे.या कालदर्शिका डिजिटल प्रत येत्या काळात नागरिकांना पोहचेल अशी व्यवस्था आयोजकांनी केली आहे. या कालदर्शिकेसाठी उपाध्यक्षा डॉ कोमल काशीकर,डॉ अजय सारंगपुरे,डॉ प्रांजल मोरघडे, डॉ प्रणय चांदेकर, डॉ ज्ञानेश् ढाकुलकर, डायगनोपल्स चे श्री राकेश डिकॉदवार, डायगनोपेन यांनी सहकार्य केले.