– खापरखेडा पोलीसांची कार्यवाही
खापरखेडा :- येथील डीवी पथक यांना दिनांक ०२/०९/२०२४ रोजी गुप्तसुत्राव्दारे माहीती मिळाली की सुनिल राधेरमन कुशवार वय ३८ वर्ष रा. दहेगाव रंगारी याचेकडे देशी माउझर आहे. अश्या माहीतीवरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी. वो पथकाने सुनिल कुशवार यास ताब्यात घेऊन सविस्तर विचारपुस केले असता त्याने कबुल केले की माझाकडे एक देशी लोखंडी माउहार आहे व ती मी माझा ताब्यातील वलनी येथील डब्लु सी एल चे चंद व खाली क्वार्टरमध्ये ठेवलेली आहे. अशी कबुली दिल्याने डी बी पथक हे वलनी कॉलनी डब्लु सी एल चे क्वार्टरमध्ये सुनिल कुशवाह सोबत जावुन त्याने त्या क्वार्टरमधुन एक देशी लोखंडी माउझर काढुन दिल्याने आरोपीचा ताब्यातुन एक देशी लोखंडी माउझर किंमती ५०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द कलम ३/२५ भाहका सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागिय पोलीस अधिक्षक संतोष गायकवाड सा. यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोस्टे खापरखेडा अरविंदकुमार कातलाम सा., पोउपनि आरती नरोटे, डी.वी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव मुकेश वाघाडे, कविता गोंडाने राजु भोयर, राजकुमार सातुर, विठ्ठल वंजारी यांचे पथकाने पार पाडली आहे.