– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 9-राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओबीसी आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले .या विधेयकाद्वारे नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा अधिकार हा राज्य शासनाकडे गेला असून शासन निर्देशानुसार प्रभाग निश्चिती होणार आहे.मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखडा कार्यक्रम नुसार उद्या 10 मार्च ला प्रसिद्धीस होणारी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात न यावी यासंदर्भात शासनाचे कुठलेही आदेश प्रशासनाला प्राप्त न झाल्याने निवडणूक कार्यक्रमानुसार उद्या 10 मार्च ला प्रसिद्धीस करण्यात येणारा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कामठी नगर पालिका निवडणुकीचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार 2 मार्च ला प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर परिषद च्या प्रभागाची संख्या , त्याची प्रभाग निहाय एकूण अनुसूचित जातो तसेच अनुसूचित जमाती सन 2011 च्या जनगननेनुसार लोकसंख्या क्षेत्र , सीमांकन व नकाशा जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीसाठी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोपविण्यात आला होता यानुसार जिल्हाधिकारी ने मंजूर केलेल्या नुसार उद्या 10 मार्च रोजी कामठी नगर परिषद येथे प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने आता प्रशासक राज सुरू आहे.शहरातील नगरपालिकेत 1 प्रभाग वाढणार असून 2 नगरसेवकांची वाढ होणार आहे.तर प्रभाग रचना नेमकी कशी असेल ,नवीन कोणता भाग वाढला असेल याची उत्सुकता उद्या जाहीर होणाऱ्या प्रभाग रचनेतून संपणार असली तरी उद्या प्रसिद्ध होणारा प्रारूप प्रभाग रचना आराखडा कायम राहील की रद्द होईल याबाबत संभ्रमता अजूनही कायम आहे.