दोन दुचाकी चोरटे गजाआड
नागपुर –  दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अंबाझरी पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस करत आहेत. प्राप्त माहिती नुसार  पो.स्टे. अंबाझरी हद्दीत अंबाझरी टेकडी, साकेत अपार्टमेन्ट समोर फिर्यादी अनमोल संजय ढोमणे , वय 20 यांनी घरासमोर लावलेली रॉयल एनफील्ड कंपनीची बुलेट क्र. एमएच 31 एफएच 3605 काळया रंगाची किमंत अंदाजे 1 लक्ष रुपये ची पार्क करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
                  अशा फिर्यादीने दिलेल्या रिपोर्ट वरून पो.स्टे. ला कलम 379 भादवि प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपास अनुशंगाने पोस्टे अंबाझरी चे डीबी पथकाने सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे आरोपीबाबत माहीती प्राप्त करीत सदर गुन्हयात दोन आरोपी सिवनी मध्यप्रदेश येथील असल्याचे निश्पन्न केले. व सापळा रचुन आरोपी नामे 01) रूद्रसिंग तारााचंद रहांगडाले, वय 22 साई नगर, दाभा वाडी नागपूर 02) सचिन मानसिंग भगत, वय 21 संतोषी ले-आऊट गणेशनगर दाभा नागपूर मुळचे दोघे राहणारे सिवणी मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले आहे .
                    सदर गून्हयाच्या तपासात आरोपींनी गुन्हाची कबुली दिल्याने आरोपींना अटक करून त्यांचे कडुन 1) रॉयल एनफिल्ड कंपनीची बूलेट क्र. एमएच 31 एफएस 3605 कि. अं. 1,00,000/-रु 2) होन्डा कंपनीची एसपी 125 गाडी एमएच 31 एफएल 2277 कि. अं.60,000/-रु असाएकुण 1,60,000 चा मुद्देमाल  जप्त करण्यात आला.
                     सदर कामगिरी  संदिप पखाले, पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. 2 नागपूर शहर निलेश पालवे सहा. पोलीस आयुक्त सिताबर्डी विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली गजानन कल्याणकर वरिश्ठ पोलीस निरीक्षक, रितेश आहेर पोलीस निरिक्षक (गून्हे), पोउपनि संदीप शिंदे पोहवा राजेश सोनवाने, पोअं अमित भूरे, रोमित राऊत, घनश्याम काळबांडे, आशिष  जाधव यांनी केली.
Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com