राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार कार्यक्रमात डिझेलच्या भडक्याने जळालेल्या तिघातून दोघांचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राणी तलाव मोक्षधाम येथे नागसेन नगर , मोदी पडाव कामठी रहिवासी सिद्धार्थ हुमने यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कार्यक्रमादरम्यान मृतकाला अग्नीचा टेंबा लावून अग्नी देत असता अचानक डिझेलचा भडका उडाल्याने तीन जण जळून गंभीर जख्मी झाल्याची घटना काल दुपारी 3 दरम्यान घडली होती. यावेळी अंत्ययात्रेत सहभागी असलेले सुधीर डोंगरे वय 45 वर्षे ,दिलीप गजभिये वय 60 वर्षे ,तसेच सुधाकर खोब्रागडे वय 50 वर्षे तिन्ही राहणार खलाशी लाईन नागसेन नगर कामठी हे चांगलेच जळून गंभीर जख्मी झाले होते.

यातील सुधीर डोंगरे व दिलीप गजभिये या दोन जख्मीना उपचारार्थ कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता परोस्थिती नाजूक असल्याने नागपूरच्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले होते तर जख्मी सुधाकर खोब्रागडे हे कामठीच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.यातील नागपूरच्या मेयो इस्पितळात उपचार घेत असलेले सुधीर डोंगरे चा काल रात्री 2 वाजता तर दिलीप गजभिये चा आज सकाळी 7 दरम्यान मेयो इस्पितळात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले तर तिसरा जख्मी सुधाकर खोब्रागडे कामठीच्या खाजगी रुग्णल्यात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी अंत्ययात्रेत शरणावरील आगीचा भडका होउन अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या शोकाकुल नागरिकांना आग लागल्याची घटना पहिल्यांदाच ऐकिवास येत असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेने परिसरात शोकमय वातावरण पसरले आहे. तसेच या घटनेबद्दल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी भविष्यवेधी‍ शिक्षण  -रविंद्र ठाकरे

Fri Jul 29 , 2022
आदिवासी विभागाच्या 75 शाळांत सुरुवात           नागपूर : विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत भविष्यवेधी शिक्षण प्रणाली महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणितीय, भाषिक, आंतरवैयक्तिक तसेच निसर्गवादी बुद्धिमत्ता आदींमध्ये परिणामकारक बदल झाले आहे. विभागातील आदिवासी विकास विभागाच्या 75 शाळांमध्ये भविष्यवेधी शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी आज येथे दिली.           शिक्षकांनी अध्यापन पध्दतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा काळानुरुप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!