संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राणी तलाव मोक्षधाम येथे नागसेन नगर , मोदी पडाव कामठी रहिवासी सिद्धार्थ हुमने यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कार्यक्रमादरम्यान मृतकाला अग्नीचा टेंबा लावून अग्नी देत असता अचानक डिझेलचा भडका उडाल्याने तीन जण जळून गंभीर जख्मी झाल्याची घटना काल दुपारी 3 दरम्यान घडली होती. यावेळी अंत्ययात्रेत सहभागी असलेले सुधीर डोंगरे वय 45 वर्षे ,दिलीप गजभिये वय 60 वर्षे ,तसेच सुधाकर खोब्रागडे वय 50 वर्षे तिन्ही राहणार खलाशी लाईन नागसेन नगर कामठी हे चांगलेच जळून गंभीर जख्मी झाले होते.
यातील सुधीर डोंगरे व दिलीप गजभिये या दोन जख्मीना उपचारार्थ कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता परोस्थिती नाजूक असल्याने नागपूरच्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले होते तर जख्मी सुधाकर खोब्रागडे हे कामठीच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.यातील नागपूरच्या मेयो इस्पितळात उपचार घेत असलेले सुधीर डोंगरे चा काल रात्री 2 वाजता तर दिलीप गजभिये चा आज सकाळी 7 दरम्यान मेयो इस्पितळात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले तर तिसरा जख्मी सुधाकर खोब्रागडे कामठीच्या खाजगी रुग्णल्यात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी अंत्ययात्रेत शरणावरील आगीचा भडका होउन अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या शोकाकुल नागरिकांना आग लागल्याची घटना पहिल्यांदाच ऐकिवास येत असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेने परिसरात शोकमय वातावरण पसरले आहे. तसेच या घटनेबद्दल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.