कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या तांडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला युवा मंच बाजार चौक, तांडा आणि समस्त तांडा ग्रामवासी तर्फे आज दिनांक 30 डिसेंबर सोमवारपासून दोन दिवसीय जलसाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज 30 डिसेंबर सोमवारला सायंकाळी आठ वाजता लावणी व डान्स च्या कार्यक्रम तर उद्या 31 डिसेंबर मंगळवार ला सकाळी नऊ वाजेपासून लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार टेकचंद सावरकर, सह उद्घाटक म्हणून मौदा पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम, ग्रामपंचायत तांडा माजी उपसरपंच चंद्रशेखर जाधव, अध्यक्ष म्हणून अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत, माजी मौदा पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल, तांडा पोलीस पाटील पल्लवी गेडाम, ग्रामपंचायत खात माजी सरपंच कैलास वैद्य, महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष तांडा गंगाधर डोरले, ग्रामपंचायत माजी सरपंच मेहमुद्दीन तुरक, कोतवाल मुरलीधर सयाम, ग्रामपंचायत तांडा माजी उपसरपंच गंगाधर हटवार, तर गावातील ,परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे .तरी या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.