अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदा येथील तिथदास बालचंद पारधी हे शेतात रोहिणी काम करित असताना बैलजोडी व दतार घेऊन शेतातील दुसऱ्या बाधित नेत असताना अचानक विज कडाडल्याने ती वीज बैल जोडी वर पडल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाले आहे. सदर घटना दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच तिरोडा तहसीलदार प्रशांत घोरूडे, हुपराज जमईवार उपसभापती पंचायत समिती तिरोडा,यांनी घटनास्थळी भेट दिली.त्यानंतर डॉ. चैतलाल भगत पंचायत समिती सदस्य, निशा पारधी सरपंच, बंडु पारधी यांनी भेट दिली. बैल जोडीची कींमत अंदाजे 60 हजार रुपये असल्याची माहिती मिळत आहे . शेतकऱ्याला शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे . घटनेचा पंचनामा डी एच पोरशेटीवार मंडळ अधिकारी व तलाठी पी एस आचले यांनी केले.