नागपूर :- दिनांक ०५.१०.२०२१ चे २९.४५ वा. चे सुमारास पो ठाणे कपिलनगर हद्दीत, सुगत नगर, नारी रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी पलाश प्रदिप गजभिये वय ३६ वर्ष यांनी त्यांची बजाज पल्सर मोटरसायकल के. एम. एच ४९ वि.सी ४८२३ किमती ७५,०००/- रु.ची घरासमोर लॉक करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो ठाणे कपिलनगर येथे अज्ञात आरोपी विरूद्ध कलम ३७९, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे संमांतर तपासात गुन्हे शाखा युनिट १चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशिर गुप्त बातमीदाराचे माहिती वरून सापळा रचुन आरोपी १) प्रजित राजकुमार भिसेन, वय २० वर्ष, रा. गोरेवाडा, आखरी बस स्टॉप, पोलीस ठाणे गिट्टीखदान, नागपूर २) रविंद्र ब्रिजलाल कुमरे वय १९ वर्ष रा. कामकासूर, जि. शिवनी, मध्य प्रदेश व त्यांचा एक विधीसंघर्षग्रस्त बालक साथिदार यांना ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली असता आरोपींनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी क. १ व २ यांना नमुद् गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपींचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेलेली पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे. आरोपींना अधिक सखोल विचारपूस केली असता आरोपींनी २) पोलीस ठाणे मानकापूर हदीतून हिरो होन्डा स्प्लेन्डर मोटरसायकल क्र. एम.एच ४९ वि.बाप २०८४ किमती ६०,०००/- रू ३) पोलीस ठाणे बरघाट, जि. शिवनी, मध्य प्रदेश येथुन स्प्लेन्डर मोटरसायकल क. एम.पी २२ एम.पी ७१४६ किमती ६०,०००/- ४) पोलीस ठाणे कुरई, जि. शिवनी, मध्य प्रदेश येथून येथून स्प्लेंडर मोटरसायकल क. सि.जी ०४ सि.एल ७५८८ किमता ६०,०००/- रुची असे एकुण चार मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी क. १ व २ यांचे ताब्यातून एकूण चार मोटरसायकली किमती अंदाजे २,५५,०००/- रूचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव कपिलनगर पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. सुहास चौधरी पोहवा नुतनसिंग छाडी, बचन राउत, विनोद देशमुख नापेज, रविद्र राउत, मनोज टेकाम, शुशांत सोळंके, सोनू भावरे, अमर रोठे, हेमंत लोणारे, योगेश सातपुते, रितेश तुमडाम यांनी केली आहे.