वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री सुरज पोर्टल महत्वाचे – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

▪️प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे ‘प्रधानमंत्री सुरज’ PM-SURAJ या राष्ट्रीय पोर्टलचे लोकार्पण

▪️विविध लाभार्थ्यांना लाभाचे वाटप

नागपूर :- समाजातील वंचित लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी गावपातळीवरील शासकीय यंत्रणेसह डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर हा अधिक मोलाचा ठरला आहे. केंद्र शासनाने यादृष्टीने अधिक सुलभतेसाठी प्रधानमंत्री सामाजिक उत्थान रोजगार आधारीत जनकल्याण ॲप मोलाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री सुरज या राष्ट्रीय पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. यासाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय अंतर्गत भारतातील प्रमुख शहरात दूरदृष्यप्रणालीद्वारे देशव्यापी शासकीय योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. नागपूर येथे हा समारंभ दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पीपीई किट, शैक्षणिक कर्ज, आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या समारंभास नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील सुमारे 500 लाभार्थी उपस्थित होते. यात सफाई कामगार, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत, व्यवसायासाठी कर्ज प्राप्त लाभार्थी, शैक्षणिक कर्ज प्राप्त लाभार्थी यांचा सहभाग होता.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ या तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत देशातील सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचारी यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सूरज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. समाजातील सर्वात उपेक्षित घटकांचे उत्थान करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Ticket Vending Machines at Metro Stations for Faster Movement

Thu Mar 14 , 2024
– MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED (Nagpur Metro Rail Project) • Nagpur Metro Blends Digital Payment with Automation NAGPUR :- With digital payment mode becoming norm of the day and automation fast picking across the country, Maha Metro Nagpur has combined the two concepts to provide a seamless Metro Ride. Nagpur Metro has installed Ticket Vending Machines (TVMs) at almost […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com