नागपूर : प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखा पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे उद्या 17 जानेवारीला 4 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, महामार्ग पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते, शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राडोड यांची प्रमुख्य उपस्थिती राहणार आहे.
नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी(शहर) रविंद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी(ग्रामीण) विजय चव्हाण आणि वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी केले आहे.