अवघ्या 48 तासात चोरीचा पर्दाफाश करण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 29 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा येथील फिर्यादी प्राणितसिंह वर्मा यांच्या घरासमोर उभी असलेली कार कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला गती दिली असता अवघ्या 48 तासात चोरीचा पर्दाफाश करून चोरीस गेलेली कार चोरट्याकडून हस्तगत करून चोरट्यास अटक करण्यात आले असून अटक आरोपीचे नाव सुरेंद्र गोपाल शाहू वय 25 वर्षे रा गुलशन नगर कळमना नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी प्राणितसिंह वर्मा हे 25 डिसेंबर ला रात्री 9 वाजता घरी येऊन 3 लक्ष 20 हजार रुपये किमतीची बलनो कार क्र एम एच 49 बी के 7587 घरासमोर उभी करून कार लॉक करून घरी झोपले असता सकाळी 5 वाजता उठून बघितले असता कार दिसली नसल्याने शोधाशोध केला मात्र कारचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती देत अवाघ्या 48 तासात चोरट्याचा शोध लावून आरोपीस अटक करण्यात आले.

ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त,एसीपी नलावडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, पोलीस उपनिरीक्षक आकाश माकने,डी बी स्कॉड चे दिलीप ढगे, धर्मेंद्र राऊत,श्रीकांत विष्णुरकर,अंकुश गजभिये,अमोल शेळके यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com