शाहू महाराजांच्या नियोजित स्मारकाचे आज बसपा ने भूमिपूजन केले

नागपूर :- आरक्षणाचे जनक बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नागपुरात भव्य स्मारक व्हावे यासाठी 31 जानेवारी 2003 रोजी मनपाचे तत्कालीन महापौर विकास ठाकरे यांनी दिलेल्या रुलिंग नुसार व 19 फेब्रुवारी 2004 रोजी मनपाने मंजूर केलेल्या नकाशानुसार मेडिकल चौकात अजून पर्यंत मनपाने स्मारकाबाबत काही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आज शाहू महाराजांच्या 150 व्या जयंती निमित्ताने कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत घोषित केल्यानुसार बसपा कार्यकर्त्यांनी मेडिकल चौकातील त्या नियोजित स्मारकाच्या स्थळावर आज भूमिपूजन केले.

आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरक्षणावर चर्चा सुरू आहे. या आरक्षणाचे जनकच मुळात राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यांनी आपल्या संस्थानात 1902 ला 50 टक्के आरक्षण सुरू केले होते. आजपासून 124 वर्षांपूर्वी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहास्तव 30, 31 मे व 1 जून 1920 रोजी नागपुरात झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाच्या परिषदे करीता आले होते. त्यानंतर 20 जुलै 1920 रोजी नागपुरातील चोखामेळा वस्तीगृहाला 5 हजार रुपयाची मदत देऊन गेले. अशा बहुजन महापुरुषांचा पुतळा व स्मारक नागपुरात व्हावे यासाठी बसपा मागील 20 वर्षापासून प्रयत्नशील आहे. 26 जुलै हा शाहूंचा आरक्षण दिवस असल्याने त्यादिवशी मनपा व शासनाने त्या स्मारकाची विधिवत पायाभरणी करावी, अन्यथा बसपा ती पायाभरणी करेल असा इशारा सुद्धा याप्रसंगी देण्यात आला.

आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसपाच्या महिला नेत्या व माजी प्रदेश सचिव रंजना ढोरे या होत्या. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे होते. यावेळी शाहूंचे सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, राजकीय अशा विविध पैलूवर बसपा नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी नगरसेवक संजय जयस्वाल, गौतम पाटील, अजय डांगे, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, अभिलेश वाहाने, सुरेंद्र डोंगरे, सदानंद जामगडे, बुद्धम राऊत, सावलदास गजभिये, संजय इखार, गौतम गेडाम, सुनील कोचे, वर्षा वाघमारे, करुणा डहाट, नितीन वंजारी, शंकर थुल, चंद्रशेखर कांबळे, प्रवीण पाटील, अनिल मेश्राम, सचिन मानवटकर, जितेंद्र पाटील, विकास नारायणे, विलास मून, अरुण शेवडे, जनार्दन बनसोड, एन आर उके, विनय पाटील, मिलिंद बोंदाडे, बालचंद्र जगताप, भानुदास ढोरे, जीवन वाळके यांच्यासहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

Thu Jun 27 , 2024
मुंबई :- विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com