नवी दिल्ली :- गुरांनी रस्ते ओलांडण्यामुळे मानवी जीवितहानी होणारे धोकादायक अपघात टाळण्यासाठी, गुरांना रस्ते ओलांडण्यापासून रोखण्यासाठी भारतातील महामार्गांलगत बाहु बली गुरे प्रतिबंधक कुंपण घालण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी विविध ट्वीट्सच्या मालिकेतून सांगितले आहे.
हे कुंपण 1.20 मीटर उंच असेल आणि एक सर्वसमावेशक उपाय म्हणून महामार्ग-30 च्या सेक्शन 23 वर घालण्यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी एक सादरीकरण म्हणून हे कुंपण काम करेल, असे ते म्हणाले.
हे गुरे प्रतिबंधक कुंपण बांबूपासून बनवलेले असून अतिशय प्रभावी आणि पर्यावरणस्नेही उपाय आहे, असे त्यांनी सांगितले. या कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूंवर क्रियोसोट तेलाची प्रक्रिया केली जाते आणि त्यावर एचडीपीईचा थर दिला जातो ज्यामुळे पोलादाच्या ऐवजी एक भक्कम पर्याय म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. या कुंपणाला प्रथम श्रेणीचे अग्नी मानांकन असून, ते सुरक्षा सुनिश्चित करणारे आणि आत्मनिर्भर भारताला अनुसरून आहे. यामुळे सर्व महामार्ग शाश्वत बनतील आणि वन्यजीव आणि गुरांची हानी कमी होईल, असे गडकरी यांनी सांगितले.