नागपूर :- फिर्यादी यांना नागपूर ते दिल्ली व दिल्ली ते नागपूर अशी फ्लाईट बुक करायची होती म्हणून ऑनलाईन गुगलवर सर्च करून त्यासंबंधित एक पेज ओपण झाला असता, त्यात माहिती भरली. त्यामुळे फिर्यादी यांचे अकाउंट मधुन २०४७८५/- रू. डेविट झाले. दिनांक १७/०५/२०२३ रोजी सायबर टिम हि कळमेश्वर हददीत जनजागृती कार्यक्रम घेणे कामी गेले असता तक्रारदार यांनी त्यांचे सोबत झालेली हकीकत सांगीतली तेव्हा सायबर टिम यांनी तात्काळ दखल घेत कार्यवाही करून तक्रारदार यांचे पैसे परत करण्यात सायबर पोलीस स्टेशनला यश आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले तसेच सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस उप निरीक्षक निशांत जुनोनकर, पोलीस उपनिरीक्षक भारत विटे तसेच महिला पोलीस हवालदार स्नेहलता ढवळे, पोलीस नायक वर्षा खंडाईत, संगीता गावंडे, संतीश राठोड, पोलीस शिपाई मृणाल राऊत महिला पोलीस शिपाई वैष्णवी पवार यांनी पार पाडली. सर्व जनतेला आव्हान करण्यात येते की, अशा प्रकारच्या ऑनलाईन फ्रॉडला बळी पडु नये.
ऑनलाईन फसवणुकीत १०४७८५ /- रूपये थांबविण्यात नागपूर ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनला यश
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com