दुचाकीचोरी करणारे दोन सराईत चोरटे गजाआड  ; 04 चोरीचे गुन्हे उघड

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची कारवाई  मोटर सायकल चोरीचे 04 गुन्हे उघडकीस ;  एकुण 2,25,000/- रू. चा मुद्देमाल जप्त..

नागपूर – ग्रामीण जिल्हयात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने  पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. चे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने, ही बाब अत्यंत गांभिर्याने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून पथके तयार केली.

दिनांक 14/07/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक कन्हान उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त माहीतगाराकडून खात्रीशिर माहीती मिळाली की, पोलीस ठाणे खापरखेडा व नागपुर ग्रामीण हद्दीतुन चोरी केलेल्या दुचाकी रोहीत वर्मा नावाचे इसमाने त्याचा साथीदार इशाक खान याचे सोबत चोरून रोहीत वर्मा राहत असलेल्या चनकापुर येथील त्याचे घराचे आवारात ठेवलेल्या असुन त्या दुचाकी वाहन ते विकण्याचे तयारीत आहेत.

अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने चनकापुर वेकोली क्वॉर्टर कं्र. 42/3 येथे धाड घातली असता आरोपी नामे- क्र. 1. रोहीत रामनरेश वर्मा वय 21 वर्ष रा. पाताखेडा ता. घोडाडोगंरी जि. बैतुल याचे क्वॉर्टरचे मागे असलेल्या रूमची पाहणी केली असता त्याचे पडीत रूममध्ये चार वेगवेगळया कंपनीच्या मोटर सायकल दिसुन आल्या. आरोपी क्र. 1 ने सदर मोटरसायकल या त्याचा मित्र आरोपी क्र. 2. इशाक खान रा. गोदिंया याचेसह मिळुन वेगवेगळया चोरी केल्याचे कबुल केले. साथीदार इशाक फिरोज खान वय 21 वर्ष रा. फूलचुर पेठ आयटीआय गोदिंया यास ताब्यात घेण्यात आले असता त्याने सुध्दा रोहीत वर्मा सोबत सदरच्या मोटरसायकल चोरी केल्याचे सांगीतले. आरोपीतांच्या ताब्यातुन एकुण 04 मोटर सायकल एकुण कि. 1,25,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, आरोपी व मोटर सायकल पुढील कायदेशिर कार्यवाही करीता पोस्टे खापरखेडा यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

आरोपीतांच्या ताब्यातुन तसेच घटनास्थळावरून खालील प्रमाणे मोटर सायकल व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणिकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि अनिल राऊत, पोहवा ज्ञानेश्वर राउत, पोहवा विनोद काळे, पोहवा अरविंद भगत, पोना शैलेश यादव, पोना विरेंद्र नरड, पोना प्रणय बनाफर, पोना रोहन डाखोरे, पोना सत्यशिल कोठारे, चालक सफौ साहेबराव बहाळे व सायबर सेलचे पोना सतिश राठोड यांचे पथकाने पार पाडली.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com