गुरुवारी जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह

  • रुग्ण डिस्चार्ज00
  • एकूण डिस्चार्ज58971
  • एकूण पॉझिटिव्ह60106
  • क्रियाशील रुग्ण02
  • आज मृत्यूशून्य
  • एकूण मृत्यू1133
  • रिकव्हरी रेट98.11 टक्के
  • मृत्यू दर01.89
  • आजच्या टेस्ट221
  • एकूण टेस्ट474281

भंडारा, दि. 25 : जिल्ह्यात गुरुवारी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून आज (दि.25) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. गुरुवारी 221 व्यक्तींची चाचणी केली असता एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58971 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60106 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 74 हजार 281 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 01, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
  • जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत,त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
  • सध्या सणासुदीचे दिवस आहेत आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • कोविडवर्तणूक नियमावलीचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनाला आयआयटीएफमध्ये ग्राहकांची खास पसंती महाराष्ट्र दालनाला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद  

Fri Nov 26 , 2021
 नवी दिल्ली : हळद, बेदाणा, मसाले, चामडयाची उत्पादने, बाबुं फर्निचर, पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल आदि महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनांना राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) देश-विदेशातील ग्राहकांची खास पसंती मिळत आहे.              महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगतीमैदान येथील हॉल क्र. २ मध्ये              राज्याचे विद्युत वाहन धोरण, राज्यातील महत्वाचे प्रकल्प, स्टार्टअपची  विविध उत्पादने  व  हस्तकला उत्पादनांनी सज्ज व सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com