यवतमाळ :- लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी जातांना केवळ तीन वाहनांनाच परवानगी राहणार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सदर आदेश पारीत केले आहे. या आदेशाप्रमाणे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनाच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश राहणार नाही.
नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्तींशिवाय अधिकच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकराच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध राहील, असे आदेशात नमूद आहे.