कांद्री येथे सोन्यासह सवा दोन लाखाची घरफोडी

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

बंद घरातुन चोरट्यांनी सवा दोन लाख रूपया चे सोन्याचे दागिने चोरून पसार.

कन्हान ( नागपुर) :- पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक पाच येथील गजानन मंदिरा जवळील कविता शुक्ला यांचा घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिण्यासह एकुण दोन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी कविता शुक्ला यांचे तक्रारीने पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .

प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.२१) डिसेंबर ला कविता राकेश शुक्ला वय ५५ वर्ष रा.गजानन मंदिर कांद्री हे आपल्या पती सोबत त्यांची लहान मुलगी प्रिंसी शुक्लाला भेटायला घरातील सर्व दरवाजे , खिड़की बंद करुन मुख्य दरवाज्यास कुलुप लावुन दुपारी १.३० वाजता याकुब खॉन च्या ऑटो मध्ये बसुन रेल्वे स्टेशन नागपुरला निघाले असता दुपारी ४ वाजता दरम्यान कविता शुक्ला व त्यांचे पती ट्रेन मध्ये बसुन नागपुर वरून दिल्ली ला निघाले असता प्रवास करते वेळी बुधवार (दि.२२) डिसेंबर ला सकाळी ७. ५० वाजता कविता शुक्ला यांना त्यांचे घरा शेजारी राहणा-या  वर्मा यांनी फोन करून सांगितले कि, तुमचा घराचा दरवाजा उघडा आहे. अश्या माहिती वरून कविता शुक्ला यांनी आपल्या दिर नामे धर्मराज शुक्ला राह. साई नगर कन्हान यांना फोन करून घराकडे जावुन पाहणी करायला सांगितले. तसेच कविता शुक्ला यांनी आपल्या लहान मुलीला फोन मध्ये ऑनलाईन सीसीटीवी कैमरे चेक करायला सांगितले असता लहान मुलीने घरी चोरी झाल्याची माहिती दिली. आणि दिर धर्मराज शुक्ला यांनी कविता शुक्ला यांना घराच्या बेडरुम मधील समान अस्त व्यस्त पडुन असल्याची माहिती दिली.

गुरूवार (दि.२३) डिसेंबर ला कविता शुक्ला हे आपल्या लहान मुलीला घेऊन दिल्ली वरुन नागपुरला निघुन (दि.२४) डिसेंबर ला कविता शुक्ला हे आपल्या लहान मुली सोबत नागपुर ला पहोचुन त्यांनी आपल्या घरी येऊन पाहणी केली असता घरातील दरवाज्याची कड़ी तुटलेल्या अवस्थेत दिसली आणि बेडरूम मध्ये लावलेले कुलुप तुटलेला दिसले. आत जाऊन पाहणी केली असता बेडरूम मधिल दोन लाकड़ी आलमारीचे कुलुप तुटलेला असुन आलमारीत ठेवलेली १) सोन्या ची पानछाप आंगठी ५.६९ ग्रॅम, २) पिट्टु सोन्याचे मनी ०५ ग्रँम, ३) जेन्टस् सोन्याची आंगठी ४.८१ ग्रँम, ४) सोन्याची नथ १.६६ ग्रँम, ५) चांदी चे कंगन किंमत ३००० रूपये आणि ६) नगदी ३००० रूपये दिसले नाही. कविता शुक्ला यांनी पुजा घरात जाऊन पाहणी केली असता पुजा घरात ठेवलेले ७) एक जेन्टस् सोन्याची चैन १०.०० ग्रँम, ८) २ सोन्याचा गोप २० ग्रँम, ९) २ सोन्याचे मंगलसुत्र १५ ग्रँम, १०) ३ जेन्टस आंगठी १५ ग्रँम, ११)१ लेडी सोन्याची आंगठी ४. ८१ ग्रँम, १२) २ सोन्याच्या कानाची बाली २.५० ग्रँम असा एकुण ८९.९७ ग्रँम चा सोने १० ग्रँम २५,००० रूपये प्रमाने एकुण २,२५,००० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी चोरट्यांनी घरफोडी करित चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी कविता शुक्ला यांचे तक्रारीने पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ७५१/२२ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा सीसीटीवी फुटेज च्या आधारे आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com