संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नुकत्याच 19 एप्रिल ला संपन्न झालेल्या नागपूर रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतरही लागू असलेली ब आदर्श आचारसंहीता कायम आहे .विदर्भात एकीकडे अवकाळी पाऊस सुरू आहे तसेच उष्णतेची लाटही कायम आहे.लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे विकासकामांचे पाहणी करणे,शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करणे,यासारखे कामात अडथळा निर्माण होत आहे.त्यातच साथ रोग नियंत्रण करणे,पाणी टंचाई चा प्रश्न सुद्धा निकाली लावण्यात अडचण निर्माण होत आहे तेव्हा विदर्भातील नागपूर रामटेक लोकसभा 2024 ची लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी कामठी पंचायत सभापती दिशाताई चनकापुरे यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केले आहे.