मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
विद्युत लोखंडी खांब व अल्युमिनीयम तार असे ६२ हजार रुपये च्या मुद्देमाल चोरी.
कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत ३ कि. मी. अंतरा वरील सिहोरा येथिल महालक्ष्मी कंपनी ते सिहोरा गाव शिवारातील विद्युत लाईनचे लोंखडी विद्युत खांब व त्या वरील अल्युमिनीयम तार कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून आरोपी चा शोध घेत आहे.
मगलवार (दि.२८) डिसेंबर २०२२ चे सायंकाळी ५ वाजता ते (दि.३०) डिसेबर चे सकाळी ११ वाजता दरम्यान कन्हान विद्युत विभाग कार्यालयाचे सहायक अभियंता प्रल्हाद ओमकार यांना सिहोरा गावच्या एका शेतक-याने फोन करून सांगीतले की, महालक्ष्मी कंपनी ते सिहोरा गावच्या ११ केवी च्या विधृत लाईन चे विद्युत खांब व त्या वरील अल्युमिनीयमचा तार कोणी अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे. यामुळे कन्हान विद्युत केंद्राच्या कर्मचा-याना सोबत घेऊन सिहोरा येथे घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता एक विद्यृत खांब व विद्युत अल्युनिनियम ५४० मिटर तार दिसला नाही. महालक्ष्मी कंपनी ते सिहोरा गाव पर्यंत शिवारात लावलेले विद्युत खांबा पैकी एक लोखडी विधृत खांब व त्या वरील ५५ एम एम विधृत अल्युमिनीयमचा ५४० मिटर तार किंमत अंदाजे ६२००० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरानी चोरून नेल्याने सदर प्रकरणी कन्हान विद्युत कार्यालय हनुमान नगर चे शहर विद्युत विभाग सहायक अभियंता प्रल्हाद ओमकार यांचे तक्रारीने पोलीसानी पो स्टे कन्हान येथे अज्ञात आरोपी विरुध्द अप क्र ७६१/ २२ नुसार कलम ३७९ भादंवि व भारतिय विद्युत अधिनियम २००३ अनुसार कलम १३० कायद्यान्वये गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.