मौदा :- अंतर्गत ०३ किमी अंतरावर मौजा मौदा शिवार येथे दिनांक १५/०५/२०२३ वे ०३/०० वा. सुमारास पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे मौदा हद्दीतील मौजा मौदा शिवार येथे आरोपी नामे १) अविनाश किष्णा तायवाडे, रा. खरबी नाका २) शंकर गोदर उके, रा. चिकना ३) प्रणय हिरामण कुंभलकर रा. वडोदा ४) विनोद कुमार सैनी, रा. माचनी यांनी विना परवाना अवैधरित्या साठवुन ठेवलेली रेती चोरी करतांना मिळून आल्याने आरोपीतांच्या ताब्यातून १) टाटा कंपनीचा टक एम. एवं ४० / बी. एल. ४१८६ किंमती अंदाजे २५,००,०००/- रु. २) ट्रक क्र. एमएच-४० वी. एल- ४९८६ नया डाल्यातील अंदाजे ४ ब्रास रेती किमती अंदाजे २०,०००/- रु ३) इको एक्सपर्ट कंपनीची विना क्रमांकाची जेसीबी किंमती अंदाजे २५,००,०००/- रु. असा एकूण ५०,२०,०००/- रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोलीस शिपाई विकास मस्के पोस्टे मौदा यांचे रीपोर्ट वरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीताविरुद्ध कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असून गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार देशमुख हे करीत आहे.