एमआयडीसीत घरफोडी

नागपुर :- दिवाळीनिमित्ताने बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांकडे चोरट्यांनी बंद घराचा कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करत दागीन्यांसह रोख अशा ९४ हजाराच्या ऐवजावर हात साफ केला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्ह्याची नोंद केली आहे.

प्राप्त माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील गणेश कॉलोनी गोविंदराव हाईट्स – फ्लॅट क्र. २०१ येथे किरायाने राहणारे दौलत विनायकराव पतंगे (वय ३०) हे ११ नोव्हेंबर रोजी आपल्या घराला कुलूप लाऊन दिवाळीनिमित्ताने बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ११ ते १३ नोव्हेंबरच्या दरम्यान पतंगे यांच्या बंद घराचा कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करत आलमारीतून दागीन्यांसह रोख १५ हजार असा ९४ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

NewsToday24x7

Next Post

अट्टल दुचाकी चोरटा गजाआड

Fri Nov 17 , 2023
नागपूर :- शहरासोबतच ग्रामीण भागातुनही दुचाकी चोरी करणाºया अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधण्यात शहर गुन्हेशाखेच्या युनिट क्र. ५ च्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करून, त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले असून, या गुन्ह्यातील चोरीचे चारही वाहने जप्तही केली आहेत. सैय्यद नौशाद अली सैय्यद मुनावर अली (वय ४२) रा. राणीदुर्गावती चौक यादवनगर गल्ली नं. ३ असे अटकेतील चोरट्याचे नाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com